शहरं
Join us  
Trending Stories
1
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
2
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
3
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
4
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
5
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
6
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
7
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
8
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
9
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
10
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
11
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
12
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
13
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
14
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
15
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
16
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
17
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
18
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
19
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
20
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'

अश्लिल चित्रपट पाहण्यासाठी काश्मीरमध्ये इंटरनेटचा वापर होतो, नीती आयोगाच्या सदस्यांचं वादग्रस्त विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 16:40 IST

काश्मीरमधील इंटरनेटच्या वापरासंदर्भात नीती आयोगाच्या सदस्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 

ठळक मुद्देकाश्मीरमधील इंटरनेटच्या वापरासंदर्भात नीती आयोगाच्या सदस्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. व्ही. के. सारस्वत यांनी अश्लिल चित्रपट पाहण्यासाठी काश्मीरमध्ये  इंटरनेटचा वापर होतो असं वादग्रस्त वक्तव्य केलं.जम्मूमधील 10 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बहाल करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर 5 ऑगस्ट रोजी काश्मीर खोऱ्यात लँडलाईन, इंटरनेट व एसएमएस सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर जम्मू-काश्मीर प्रशासनाकडून तब्बल 5 महिन्यांनी जम्मू विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये ‘2-जी’ मोबाईल इंटरनेट सेवा बहाल करण्यात आली. दरम्यान काश्मीरमधील इंटरनेटच्या वापरासंदर्भात नीती आयोगाच्या सदस्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 

नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत यांनी अश्लिल चित्रपट पाहण्यासाठी काश्मीरमध्ये  इंटरनेटचा वापर होतो असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 'काश्मीरमध्ये हे सर्व नेते कशासाठी जाऊ इच्छित आहेत? दिल्लीच्या रस्त्यांवर ज्या प्रकारे आंदोलनं सुरू आहेत. त्यांना काश्मीरच्या रस्त्यांवरही अशीच आंदोलनं करायची आहेत. सोशल मीडियाचा ते वापर करतात. त्यामुळे जर तिकडे इंटरनेट नसेल तर काय फरक पडतो? तसंही इंटरनेटच्या माध्यमातून तिकडे लोक काय पाहतात? अश्लिल चित्रपट पाहण्याशिवाय लोक काहीही करत नाहीत' असं व्ही. के. सारस्वत यांनी म्हटलं आहे. 

जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव रोहित कंसल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मूमधील 10 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बहाल करण्यात आली आहे. काश्मीरमधील केवळ कुपवाडा आणि बांदीपोरा या ठिकाणी 2जी इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. 15 जानेवारीपासून सात दिवसांपर्यंत जम्मू विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये ‘2-जी’ मोबाईल इंटरनेट सुविधा देण्यात आली आहे. गृहविभागाकडून देण्यात आलेल्या आदेशामध्ये काश्मीर विभागात अतिरिक्त 400 इंटरनेट कियोस्कची स्थापना केली जातील. इंटरनेट सेवा देणारे आवश्यक सेवा देणाऱ्या सर्व संस्था, रुग्णालय, बँकाबरोबच शासकीय कार्यालयात ब्रॉडबॅण्ड सुविधा देण्यात येईल. पर्यटकांच्या सुविधेच्या दृष्टीने ब्रॉडबॅण्ड इंटरनेट हॉटेल आणि यात्रा कंपन्यांना पुरवले जाणार आहेत. जम्मू परिसरातील सांबा, कठुआ, उधमपूर आणि रियासीमध्ये ई-बँकींगसह सुरक्षित वेबसाईट पाहण्यासाठी पोस्टपेड मोबाईलवर 2जी मोबाईल इंटरनेटला परवानगी दिली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

दोन मुलं जन्माला घालण्याच्या वक्तव्यावरून मोहन भागवतांचा यू-टर्न

थेट लग्नपत्रिकेतून तरुणाने दिला 'सीएए'ला पाठिंबा

24 जानेवारीला महाराष्ट्र बंद; आंबेडकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट 

Delhi Election: काँग्रेसमध्ये घराणेशाही, पक्षातील नेत्यांच्या डझनभर मुला-मुलींना उमेदवारी

India Vs Australia Live Score: ऑस्ट्रेलियाचे शतक, स्मिथ-लाबुशेनची अर्धशतकी भागीदारी

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरInternetइंटरनेटMobileमोबाइलArticle 370कलम 370