शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेदावरील वाद निरर्थक, दोन्ही उपचार पद्धती उपयोगी; DRDO च्या माजी प्रमुखांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 23:43 IST

अ‍ॅलोपॅथी आणि आयुर्वेद उपचाराचे दोन प्रवाह असल्याचं सारस्वत यांचं वक्तव्य. यावर वाद निरर्थक असल्याचं सारस्वत यांचं मत.

ठळक मुद्देअ‍ॅलोपॅथी आणि आयुर्वेद उपचाराचे दोन प्रवाह असल्याचं सारस्वत यांचं वक्तव्य.यावर वाद निरर्थक असल्याचं सारस्वत यांचं मत.

गेल्या काही दिवसांपासून अ‍ॅलोपॅथी आणि आयुर्वेद असा वाद रंगल्याचं दिसून आलं होतं. यावर डीआरडीओचे माजी प्रमुख आणि नीति आयोगाचे सदस्य व्ही.के.सारस्वत यांनी भाष्य केलं आहे. "अ‍ॅलोपॅथी आणि आयुर्वेद याबद्दल वादविदाचा काहीही अर्थ नाही. दोन्ही वेगवेगळे आणि उपयोगी उपचार पद्धती आहेत," असं सारस्वत म्हणाले. आयुर्वेदाला जनतेमध्ये अधिक स्वीकार्य बनवण्यासाठी त्यात अधिक संसोधन करण्यावर भर दिला पाहिजे असंही ते म्हणाले.

सारस्वत हे जीआरडीओकडून कोरोनाच्या उपचारांवरील औषध विकसित करण्याशी निगडीत आहेत. यावेळी त्यांनी पतंजली आणि डीआरडीओ यांच्यातील संबंधांवर सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं. डीआरडीओच्या औषधाचा पतंजलीशी कोणत्याही प्रकारचं घेणंदेणं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. "भारतात हजारो वर्षांपासून चालत आलेल्या उपचार पद्धती आहेत. आयुर्वेदीक औषधं लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्तीची क्षणता सुधारण्यासाठी परिचित आहे," असं सारस्वत म्हणाले.

दोन निराळे प्रवाह

"मला वाटतं की आयुर्वेद आणि अ‍ॅलोपॅथी हे उपचाराचे दोन निराळे प्रवाह आहेत आणि ते एकत्र पुढे जातात. एकाची एक विशेष भूमिका आहे, तर दुसऱ्याची दुसरी," असंही ते म्हणाले. या प्रकरणी वाद होणं हे निरर्थक आहे आणि दोन्ही उपचार पद्धती उपयोगी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. "मला असं वाटतं की आयुर्वेदिक उपचार पद्धतीला समाजात अधिक मान्यका मिळण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींना समजून अधिक संशोधन करण्याची गरज आहे, जे अ‍ॅलोपॅथीनं केलं आहे," असं सारस्वत यांनी नमूद केलं.2DG आणि पतंजलीचा संबंध नाही"2DG आणि पंतजली यांच्यात कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. पतंजलीला याबद्दल कोणतीही माहिती नाही आणि हे त्यांचं काम नाही," असं सारस्वत यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं. ज्यावेळी हे औषध विकसित करण्यात आलं तेव्हा आपण वैज्ञानिक सल्लागार होतो. जेव्हा औषध विकसित करण्यात आलं तेव्हा ते मूलत: कर्करोगानं पीडित रुग्णांच्या उपचाराच्या मदतीसाठी होतं असं ते म्हणाले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmedicineऔषधंpatanjaliपतंजलीBaba Ramdevरामदेव बाबाDRDOडीआरडीओ