शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धर्मनिरपेक्ष संस्कृती लपविण्यासाठी संशोधकाची अमेरिकावारी थांबवली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 16:58 IST

तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यामध्ये किळादी येथे प्राचीन संस्कृती अस्तित्त्वात असल्याचे पुरावे के. अमरनाथ यांना काही वर्षांपुर्वी सापडले होते. मात्र त्यानंतर त्यांची लगेचच बदली करण्यात आली.

ठळक मुद्देतमिळ संगमचे पी.पी. रामकृष्ण यांनी पुरातत्त्व विभागाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत हा एक दुर्देवी निर्णय आहे असे मत व्यक्त केले. किळादी हे लहानसे गाव असून तामिळनाडूतील शिवगंगा आणि मदुराई या जिल्ह्यांच्यामध्ये आहे.

चेन्नई- तामिळनाडूमध्ये सापडलेल्या किळादी संस्कृतीबद्दल अमेरिकेत भाषण देण्यासाठी चाललेल्या संशोधक के, अमरनाथ रामकृष्ण यांना पुरातत्व विभागाने परवानगी नाकारली आहे. अमेरिकेत जाण्यास मज्जाव करताना पुरातत्व विभागाने कोणतेही कारण दिलेले नाही. इ.स.पू. 200 वर्षांपूर्वी तामिळनाडूत प्राचीन संस्कृती अस्तित्त्वात होती असा दावा येथे झालेल्या उत्खनानंतर करण्यात आला आहे. तसेच येथे धर्मनिरपेक्ष समाज अस्तित्त्वात होती असे सांगण्यात येते.

तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यामध्ये किळादी येथे प्राचीन संस्कृती अस्तित्त्वात असल्याचे पुरावे के. अमरनाथ यांना काही वर्षांपुर्वी सापडले होते. मात्र त्यानंतर त्यांची लगेचच बदली करण्यात आली. आता ते पुरातत्व विभागाच्या गुवाहाटी मंडलात पुरातत्त्व अभ्यासक आहेत. अमेरिकेतील फेडरेशन ऑफ तमिळ संगम या संस्थेमध्ये त्यांना किळादी येथील संस्कृतीबद्दल बोलण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र त्यांना अमेरिकेत जाण्यास पुरातत्त्व विभागाने परवानगी नाकारली आहे.याबाबत बोलताना अमरनाथ म्हणाले, ''पुरातत्त्व विभागाने मला अमेरिकेस जाण्यास का परवानगी नाकारली हे माहिती नाही. मला यावर काहीही बोलायचे नाही.''  असे निर्णय काही विशिष्ट परिस्थितीत घेतले जातात, या निर्णयाला कारणीभूत असलेली परिस्थिती मला माहिती नाही. जर ठोस कारण असेल तर अधिकाऱ्यांना परदेशात जाण्याची परवानगी मिळते, पण प्रत्येकालाच अशी परवानगी मिळेल असे नाही. अशी प्रतिक्रिया पुरातत्व विभागाचे संचालक डी.एन तिम्री यांनी दिली आहे.2 एप्रिल रोजी अमेरिकेतील तमिळ संगम संस्थेने अमरनाथ यांना किळादी येथील प्राचीन संस्कृतीबद्दल बोलण्यासाठी आमंत्रिक तेले होते. 26 एप्रिल रोजी अमरनाथ यांनी पुरातत्व विभागाच्या उपसंचालकांकडे अमेरिकेत जाण्याची परवानगी मागितली होती. मात्र उपसंचालक ताराचंद्र यांनी 25 मे रोजी मला आपणास या कार्यक्रमासाठी जाता येणार नाही असे सांगण्यास कळवले आहे असे उत्तर पाठवले. तमिळ संगमचे पी.पी. रामकृष्ण यांनी पुरातत्त्व विभागाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत हा एक दुर्देवी निर्णय आहे असे मत व्यक्त केले. यामुळे विभागाच्या हेतूवर शंका निर्माण होते. अमेरिकेतील कार्यक्रमासाठी 5000 लोक उपस्थित राहाण्याची शक्यता होती. अमरनाथ यांचे अनुभव ऐकण्याची संधी त्यांना मिळणार होती.

पुरातन वारशाच्या अभ्यासकांनी पुरातत्व विभागाच्या हेतूबद्दल शंका उपस्थित केली आहे. किळादी येथे एक धर्मनिरपेक्ष समाज अस्तित्त्वात असल्याचे पुरावे अमरनाथ यांना सापडले आहेत. केंद्र सरकारमधील काहींना हे शोध वैदिक संस्कृतीच्या विरोधात असल्याचे वाटते. येथे कोणत्याही देवाची किंवा देवीची मूर्ती सापडलेली नाही असे एका पुरातत्व अभ्यासकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे. शिल्पअभ्यासक के. टी गांधीराजन यांनीही पुरातत्त्व विभागाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

किळादी हे लहानसे गाव असून तामिळनाडूतील शिवगंगा आणि मदुराई या जिल्ह्यांच्यामध्ये आहे. येथे झालेल्या उत्खननात प्राचीन पांड्य राजवटीचा व रोमन संस्कृतीमध्ये व्यापारी संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. या उत्खनानात मातीची भांडी, सोन्याचे हस्तीदंताचे दागिने तसेच इतर अनेक वस्तू सापडल्या आहेत.

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूIndiaभारतUSअमेरिका