शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

'संघ मुख्यालयात इफ्तार पार्टी आयोजित केली जाऊ शकत नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 17:48 IST

राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या विनंतीवर संघाची प्रतिक्रिया

नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या महाराष्ट्रातील विभागानं नागपूरमधील संघ मुख्यालयात इफ्तार पार्टी आयोजित करण्याची मागणी केली होती. यावर आता राष्ट्रीय मुस्लिम मंचानं स्पष्टीकरण दिलं आहे. 'इस्लाम कोणालाही मुस्लिम व्यक्तींसाठी पार्टी आयोजित करण्यास सांगत नाही. त्यामुळेच राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या महाराष्ट्र विभागाच्या नेत्यानं केलेल्या विनंतीमध्येच त्रुटी आहे. तशी माहिती संबंधितांना देण्यात आली आहे,' असं मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहम्मद अफझल यांनी एका इंग्रजी दैनिकाला सांगितलं. राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या महाराष्ट्र विभागाचे संयोजक मोहम्मद फारुख शेख यांनी गेल्या आठवड्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूरचे महानगर संघचालक राजेश लोया यांना इफ्तार पार्टीच्या आयोजनासंबंधी विनंती केली होती. संघाच्या मुख्यालयातील स्मृती मंदिर परिसरात इफ्तार पार्टीचं आयोजन करण्याची विनंती शेख यांनी केली होती. त्यावरुन मोठा वाद झाला होता. यानंतर शेख यांची विनंती संघाकडून अमान्य करण्यात आली. 'त्या परिसरात कोणतीही पार्टी आयोजित केली जाऊ शकत नाही,' असं उत्तर संघाकडून शेख यांना देण्यात आलं. संघाकडून नकार आल्यानंतर मोहम्मद फारुख शेख यांनी नाराजी व्यक्त केली. संघानं इफ्तार पार्टी आयोजित केल्यास त्यामुळे जगभरात बंधूभावाचा संदेश जाईल, असं मला वाटलं होतं, असं शेख म्हणाले. 'भारतात असहिष्णूता आहे, अशी चर्चा जगात आहे. त्या पार्श्वभूमीवर अशा पार्टीचं आयोजन करण्यात गैर काय?,' असा सवाल शेख यांनी उपस्थित केला. 'गेल्या वर्षी आम्ही मोमिनपुरातील जामा मशिदीसमोर इफ्तार पार्टी आयोजित केली. त्या पार्टीत संघ आणि भाजपाचे नेते सहभागी झाले होते,' असंही शेख यांनी सांगितलं. यावर भाष्य करताना, स्मृती मंदिर परिसरात असा कोणताही कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकत नाही, असं संघातील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यानं सांगितलं. सध्या स्मृती मंदिर परिसरात प्रशिक्षण सुरू आहे, असंही या अधिकाऱ्यानं म्हटलं.  

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयBJPभाजपाMuslimमुस्लीम