शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : टीम इंडियाने टॉस जिंकला; यशस्वी जैस्वाल, संजूसह ४ खेळाडू बाहेर, प्लेइंग इलेव्हनमध्ये ४ ऑल राऊंडर
2
केंद्रात पुन्हा मोदी सरकार; नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंनी भाजपला समर्थन पत्रे सोपवली
3
गरीब, महिला युवा, शेतकरी व वंचित घटकांच्या सेवेसाठी सज्ज; NDA चा ठराव, मोदी हेच प्रमुख नेते
4
केंद्रीय नेतृत्व देवेंद्रजींची 'ती' विनंती मान्य करणार नाही, कारण...; बावनकुळेंनी स्पष्ट केली भूमिका
5
मुंबई उत्तर पश्चिममध्ये 'टफ फाइट', मतमोजणी केंद्रावर नेमकं काय घडलं?
6
NDA च्या बैठकीत नरेंद्र मोदींची 'नेते' पदी निवड; आजच सत्ता स्थापनेचा दावा करणार?
7
निवडणुकीच्या निकालानंतर TDP ची 'चांदी', पक्षाशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स 20 टक्क्यांनी वाढले
8
हिंदुत्व सोडणाऱ्या उबाठाचे उमेदवार मुस्लीम मतांमुळे जिंकले; शिवसेनेची टीका
9
Lok Sabha Election Result 2024 :"आगे, आगे देखो होता...", नितीश कुमारांसोबत एकाच विमानातून प्रवासानंतर तेजस्वी यादवांचे सूचक विधान
10
"फडणवीसांनी सरकारमध्ये राहणं अतिशय आवश्यक आहे, कारण..."; भुजबळांचे रोखठोक विधान
11
नितीश कुमारांनी पलटी मारली, तरीही भाजप स्थापन करू शकतं NDA सरकार; असं आहे संपूर्ण समिकरण
12
जय-पराजय हा राजकारणाचा भाग, आकड्यांचा खेळ सुरूच राहिल; मोदींचे मंत्रिपरिषदेमध्ये 'संकेत'
13
उद्धव ठाकरेंच्या १३ पैकी ७ जागांवर एकनाथ शिंदेंची बाजी; ६ जागा ठाकरेंनी राखल्या
14
“लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीमुळे फडणवीसांचे राजीनाम्याचे नाटक”; काँग्रेसची टीका
15
एअर इंडियाच्या भाड्यावर तुमचे कंट्रोल असणार; कंपनीने सुरू केली 'ही' खास सुविधा...
16
केंद्राचे 'डबल इंजिन' पटरीवरुन उतरले; भाजपशासित राज्यातच पक्षाचे सर्वाधिक नुकसान...
17
"हे सरकार जितके दिवस चालेल..."; फडणवीसांनी राजीनाम्याचे संकेत देताच विजय वडेट्टीवारांचा खोचक टोला
18
T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : Ohh Shit! भारताच्या सामन्यावर संकट, आयर्लंडला लागेल लॉटरी 
19
मोठी बातमी! INDIA आघाडीच्या दिल्लीतील बैठकीला उद्धव ठाकरे जाणार नाहीत, काय घडतंय?
20
"फडणवीसांनी दिल्लीची दिशाभूल केली अन् मोदींना तोंडावर पाडलं": पृथ्वीराज चव्हाण

सासऱ्याच्या मालमत्तेवर जावयाचा काहीही हक्क नाही; केरळ उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2021 8:49 AM

सासऱ्याच्या मालमत्तेवर कायदेशीर हक्क असल्याचा दावा करतो हे लाजिरवाणे आहे, असे खडे बोल केरळ उच्च न्यायालयाने जावई डेव्हिसला सुनावले आहेत.

कोची : सासऱ्याच्या मालमत्तेत जावयाला कोणताही कायदेशीर हक्क नसतो तसेच तो तसा दावाही करू शकत नाही, असा निकाल केरळ उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला. हेंद्री थॉमस या सासऱ्याच्या मालमत्तेवर त्यांचा जावई डेव्हिस राफेल यांनी हक्क सांगितला होता. या प्रकरणात डेव्हिस यांनी दाखल केलेल्या याचिकेत, त्यांच्या विरोधात कनिष्ठ न्यायालयाने निकाल दिला. आता उच्च न्यायालयानेही डेव्हिस यांच्या विरोधात निकाल दिला आहे.

आपल्या मालकीच्या वास्तूत प्रवेश करण्यास न्यायालयाने जावई डेव्हिस याला कायमस्वरूपी मनाई केली आहे असे हेंद्री याने न्यायालयाला सांगितले. सेंट पॉल चर्चच्या वतीने फादर जेम्स नाझरेथ यांनी गिफ्ट डीडद्वारे काही मालमत्ता आपल्या नावावर केली होती असा दावा हेंद्री थॉमस यांनी केरळ उच्च न्यायालयात केला. स्वत:च्या पैशाने मी त्या जमिनीवर घर बांधले व आता तिथे आपल्या कुटुंबीयांसमवेत राहात आहे. या मालमत्तेवर जावयाचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही असा युक्तिवाद हेंद्री थॉमसद्वारे न्यायालयात करण्यात आला होता.

जावयाचे कृत्य लाजिरवाणेसासरे हेंद्री थॉमस यांच्या एकुलत्या एक मुलीशी लग्न झाल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या घरातील सदस्य म्हणून स्वीकारले असे जावई डेव्हिस सांगतो. तसेच त्या आधारे सासऱ्याच्या मालमत्तेवर कायदेशीर हक्क असल्याचा दावा करतो हे लाजिरवाणे आहे, असे खडे बोल केरळ उच्च न्यायालयाने जावई डेव्हिसला सुनावले आहेत.

टॅग्स :Courtन्यायालय