‘लैंगिक छळापासून कायदा करणार नाही महिलांचे रक्षण’
By Admin | Updated: November 17, 2014 03:09 IST2014-11-17T03:09:31+5:302014-11-17T03:09:31+5:30
केवळ कडक कायदे लैंगिक हिंसाचारापासून महिलांची संरक्षण करू शकत नाहीत़ या समस्येवर मात करायची असेल तर व्यापक आणि संघटित प्रयत्न गरजेचे

‘लैंगिक छळापासून कायदा करणार नाही महिलांचे रक्षण’
बंगळुरू : केवळ कडक कायदे लैंगिक हिंसाचारापासून महिलांची संरक्षण करू शकत नाहीत़ या समस्येवर मात करायची असेल तर व्यापक आणि संघटित प्रयत्न गरजेचे आहेत, असे मत भारताचे सरन्यायाधीश न्या़ एच़ एल़ दत्तू यांनी व्यक्त केले.
येथील आंतरराष्ट्रीय महिला वकील महासंघाच्या ३५ व्या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ लैंगिक अत्याचाराचे वाढते प्रमाण हा गंभीर चिंतेचा विषय आहे आणि या समस्येशी निपटण्यासाठी तात्काळ पावले उचलण्याची गरज आहे़ कडक कायदे आहेत म्हणून लैंगिक अत्याचाराचे गुन्हे होणार नाहीत, असे मानणे म्हणजे, गंभीर जखमेवर मलमपट्टी लावण्यासारखे आहे़ केवळ कडक कायद्यांनी लैंगिक हिंसाचार थांबणार नाहीत़ कारण ही समस्या केवळ कायदेशीर नाही़ यासाठी व्यापक व संघटित भूमिका घेण्याची गरज आहे़ (वृत्तसंस्था)