शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अनेक दशकांपासून वीजपुरवठाच नाही, राॅकेलवर अवलंबून; राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार मुर्मू यांच्या गावात अंधार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 10:26 IST

Draupadi Murmu : उपरबेडा गावाची लाेकसंख्या ३ हजार ५०० एवढी आहे, तर डुंगूरशाही गावात जेमतेम २० कुटुंबे राहतात. डुंगूरशाही गावात माेबाईल पाेहाेचला. ग्रामस्थ माेबाईलचा वापर करताना दिसतात; मात्र ताे चार्ज करण्यासाठी जवळपास एक किलाेमीटर अंतरावर असलेल्या बडाशाही खेड्यात जावे लागते.

बारीपाडा : राष्ट्रपतिपदासाठी एनडीएच्या उमेदवार द्राैपदी मुर्मू यांचे मूळ गाव गेली अनेक वर्षांपासून अंधारत असल्याचे उघड झाले आहे. मयूरगंज जिल्ह्यातील उपरबेडा या गावातील डुंगूरशाही नावाचे खेडे हे मुर्मू यांचे मूळ गाव आहे. डुंगूरशाही गावात माेबाईल पाेहाेचला. परंतु, वीज पाेहाेचण्यासाठी अनेक दशके वाट बघावी लागत आहे. तेथील ग्रामस्थांना राॅकेलवर अवलंबून राहावे लागत आहे. विशेष म्हणजे, उपरबेडा गावातील बडाशाही या हाकेच्या अंतरावर असलेल्या खेड्यात वीज असून, डुंगूरशाही हे खेडे मात्र वंचित आहे. उपरबेडा गावाची लाेकसंख्या ३ हजार ५०० एवढी आहे, तर डुंगूरशाही गावात जेमतेम २० कुटुंबे राहतात. डुंगूरशाही गावात माेबाईल पाेहाेचला. ग्रामस्थ माेबाईलचा वापर करताना दिसतात; मात्र ताे चार्ज करण्यासाठी जवळपास एक किलाेमीटर अंतरावर असलेल्या बडाशाही खेड्यात जावे लागते. घरांमध्ये प्रकाशासाठी लाेकांना राॅकेलच्या दिव्यांवर विसंबून राहावे लागते. (वृत्तसंस्था)

प्रशासन खडबडून झाले जागेप्रसारमाध्यमांमध्ये याबाबत बातम्या झळकल्यानंतर ओडिशा प्रशासन खडबडून जागे झाले. गावात वीजपुरवठा देण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. विजेचे खांब, ट्रान्स्फाॅर्मर आदी साहित्य घेऊन अधिकारी गावात दाखल झाले. 

आमदार, खासदारांचे दुर्लक्षमुर्मू यांचा भाचा बैरांची तुडू हे अजूनही कुटुंबीयांसह डुंगूरशाही खेड्यात राहतात. वीजपुरवठ्यासाठी अनेक लाेकांना आम्ही बाेललाे. मात्र, काेणीही त्याकडे लक्ष दिले नाही, असे बैरांची यांच्या पत्नी सांगितले. मुर्मू यांना याबाबत आम्ही कधीही सांगितले नसल्याचे त्या म्हणाल्या.

वीजपुरवठ्यासाठी वनकायद्याची अडचणडुंगूरशाही खेडे वनजमिनीवर वसलेले आहे. त्यामुळे तेथे वीजपुरवठ्यासाठी वनकायद्याची अडचण हाेती, असे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. 

 

टॅग्स :electricityवीजOdishaओदिशाElectionनिवडणूकBJPभाजपा