शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मासिक पाळीत रजा अनिवार्य केल्यास महिलांना कुणीही कामावर ठेवणार नाही : सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 10:29 IST

जनहित याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : विद्यार्थिनी आणि नोकरदार महिलांना मासिक पाळीच्या रजा देण्यास सुरुवात केली तर महिलांना कुणीच कामावर ठेवणार नाही, अशी टिपण्णी सर्वोच्च न्यायालयाने केली. अशा रजा प्रदान करण्यासाठी देशव्यापी धोरण आखण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या शैलेंद्र मणी त्रिपाठी यांच्या जनहित याचिकेवर सुनावणी करण्यास शुक्रवारी न्यायालयाने नकार दिला. 

महिलांचे करिअर संपेल

ऐच्छिक रजा ही खूप चांगली गोष्ट असली तरी जेव्हा ती कायद्याद्वारे अनिवार्य केली जाईल तेव्हा महिलांना कामावर ठेवण्यास टाळाटाळ केली जाईल आणि एक प्रकारे लिंगभेदी वृत्तीला चालना मिळेल. न्यायपालिकेत किंवा सरकारी नोकऱ्यांमध्ये महिला दिसणार नाहीत. त्यांचे करिअर संपेल, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने  दिला.

नियोक्त्यांचा विचार करा

सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने याचिका निकाली काढताना म्हटले की, अशा याचिका महिलांच्या मनात भीती निर्माण करण्यास किंवा त्यांना बदनाम करण्यास दाखल केल्या जातात. मासिक पाळी ही वाईट गोष्ट आहे हे महिलांच्या मनात बिंबवण्याचा हा प्रयत्न आहे. यात ज्या नियोक्त्याला रजा द्यावी लागणार आहे त्याचा विचार करायला हवा. सर्व भागधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर मासिक पाळीच्या रजेबाबत धोरण तयार करण्याच्या शक्यतेचा आढावा घेऊ शकतात, असे न्यायालयाने म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Period leave may deter hiring women: Supreme Court warns.

Web Summary : Supreme Court refuses to hear plea for nationwide period leave policy. Justices caution mandatory leave could deter female hiring, harm careers. Employers' perspective must be considered, court stated.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय