शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पतीला दरमहा ९ हजार पगार, पत्नीला हवी १२ हजार पोटगी; कोर्टाने कुणाच्या बाजूने दिला निकाल? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 17:33 IST

Supreme Court: पगार ९ हजार आणि पत्नीची मागणी १२ हजार? अशा एका विचित्र पेचावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

"पत्नीचा उदरनिर्वाह करणे ही पतीची कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी आहे. त्यासाठी तुम्हाला पैसे उधार घ्यावे लागले, भीक मागावी लागली किंवा चोरी करावी लागली तरी चालेल, पण पोटगी द्यावीच लागेल," अशा अत्यंत कडक शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने घटस्फोटाच्या प्रकरणातील पतीला फटकारले. पतीने दावा केला आहे की, तो दरमहा फक्त ९ हजार रुपये कमावतो. मात्र, न्यायालयाने त्याचा दावा अविश्वसनीय ठरवला. 

न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. कनिष्ठ न्यायालयाने यापूर्वी ६ लाख रुपये देऊन घटस्फोट मंजूर केला, परंतु, पत्नीने या रकमेला विरोध करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पत्नीचे म्हणणे आहे की, तिला दरमहा १२००० पोटगी मिळाली, ज्यात दरवर्षी वाढ होईल किंवा एकरकमी ३० लाख रुपये द्यावे.

पतीचे वकील जॉर्ज पोथन यांनी न्यायालयात सांगितले की, त्यांचा क्लाइंट रोजंदारीवर काम करतो आणि त्याला दिवसाला केवळ ३२५ रुपये मिळतात. महिन्याला जेमतेम ९ हजार रुपये कमावणारा माणूस १० ते १२ हजार रुपये पोटगी कशी देऊ शकेल?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, या संदर्भात प्रतिज्ञापत्र देण्याची तयारीही दर्शवली. मात्र, न्यायालयाने यावर अविश्वास दाखवला. 

"आजच्या काळात कोणी इतक्या कमी पगारावर काम करत असेल, यावर विश्वास ठेवणे अशक्य आहे. हे विधान विश्वासार्ह वाटत नाही. जर तुम्ही पोटगी देऊ शकत नसाल, तर पत्नीला सोबत ठेवा. ती तुमच्या घरी राहील, मुलांचा सांभाळ करेल आणि स्वतःचा उदरनिर्वाह करेल", असे न्यायालयाने म्हटले. जेव्हा पतीने पत्नीने पालकांविरुद्ध तक्रार केल्याचे सांगितले, तेव्हा न्यायालयाने स्पष्ट केले की, "काहीही करा, पण पत्नीच्या पोटगीची व्यवस्था करणे ही तुमची जबाबदारी आहे."

पतीने तो जिथे काम करतो त्या कंपनीला फोन करून खात्री करण्याचा सल्ला दिला. त्यावर न्यायालयाने म्हटले की, कोणती कंपनी किमान वेतनापेक्षा कमी पगार देते, हे पाहण्यासाठी कंपनीलाच बोलावले जाईल. यावर पतीच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, अशा निर्णयामुळे इतर कर्मचाऱ्यांचेही वेतन वाढण्यास मदत होईल.

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निर्णय राखून ठेवला आहे. ९ हजार रुपये पगार सांगणाऱ्या पतीला आता पत्नीच्या ३० लाखांच्या मागणीवर किंवा १२ हजारांच्या मासिक पोटगीवर काय तोडगा काढावा लागतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Supreme Court Slams Husband Earning 9K, Demanding 12K Alimony for Wife

Web Summary : Supreme Court rebuked a husband earning ₹9,000, stating providing for his wife is his responsibility, even if it meant begging. The court questioned the husband's low income claim as the wife demanded ₹12,000 monthly alimony or ₹30 lakh lump sum. Decision reserved.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय