शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

Farmers Protest : टिकैत म्हणाले,"माझ्या व्यासपीठावरून पंतप्रधानांबद्दल अपशब्द काढू शकत नाही, अशांनी निघून जावं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 19:03 IST

आंदोलनाचं वातावरण खराब न करण्याचं टिकैत यांचं आवाहन

ठळक मुद्देआंदोलनाचं वातावरण खराब न करण्याचं टिकैत यांचं आवाहन६ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या चक्का जाम, भारतीय किसान संघाचा पाठिंबा नाही

गेल्या अनेक दिवसांपासून नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलनाला हिंसक वळणही लागलं होतं. परंतु त्यानंतरही शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन सुरूच ठेवलं आहे. अशातही देशात ६ फेब्रुवारी रोजी ३ तासांचं चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली. तसंच गाझीपूर सीमेवर काही आंदोलकांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिका केली होती. दरम्यान, यानंतर टिकैत यांनी संताप व्यक्त करत आपल्या व्यासपीठावरून पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्याबद्दल कोणीही अपशब्दांचा वापर करू शकत नाही आणि अपशब्दांचा वापर करणाऱ्यांना आपल्या व्यासपीठावर जागा नाही, असं म्हटलं."पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आपल्या व्यासपीठावरून कोणीही अपशब्दांचा वापर करू शकत नाही. काही लोकं मोंदीविरोधात अपशब्दांचा वापर करत आहेत अशा तक्रारी आल्या आहेत. ती आपले लोकं असूच शकत नाहीत. जी लोकं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपशब्दांचा वापर करतील त्यांनी या ठिकाणाहून निघून जावं. तो त्याचा व्यक्तीगत निर्णय असेल. त्याला या व्यासपीठाचा वापर करू दिला जाणार नाही," असंही टिकैत यांनी स्पष्ट केलं. "जी लोकं कोणतीही आक्षेपार्ह वक्तव्य करतील त्यांच्याबद्दल आम्हाला सांगा. त्यांना हे व्यासपीठ सोडावंच लागेल. ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य असेल. या ठिकाणचं वातावरण बिलकुल खराब केलं जाऊ नये. जर आम्हाला कोणतीही गोष्ट योग्य वाटत नसेल तरी कोणाबद्दल अपशब्द काढण्याचे आपल्याला अधिकार नाहीत," असंही ते म्हणाले. दरम्यान, टिकैत यांना पंतप्रधान शेतकऱ्यांपासून केवळ एका फोनच्या दुरीवर आहेत याबाबत सवाल करण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांचा नंबर कोणता आहे सांगा, आम्ही त्यांच्याची चर्चा करू. सरकारसोबत जी कोणतीही चर्चा होईल ती शेतकरी संघटनांचीच होईल, असंही त्यांनी नमूद केलं.६ फेब्रुवारीला चक्का जाम६ फेब्रुवारीला राष्ट्रीय, राज्य महामार्गांवर चक्का जाम करण्यात येणार आहे. दिल्लीसोबतचदिल्लीच्याबाहेर चक्का तीन तासांसाठी चक्का जाम केला जाईल, अशी माहिती भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिली. 'चक्का जाम आंदोलनावेळी वाहतूक कोंडीत अडकणाऱ्यांना पाणी आणि जेवण देण्यात येईल. सरकार आमच्यासोबत कशा प्रकारचं वर्तन करतंय याची माहितीदेखील आम्ही वाहतूक कोंडीत अडकलेल्यांना प्रवाशांना देऊ,' असं टिकैत यांनी सांगितलं.Farmer Protest: 'त्या' ट्विटमुळे ग्रेटा थनबर्ग अडचणीत; दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखलभारतीय किसान संघाचा पाठिंबा नाहीराष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित भारतीय किसान संघानं चक्का जाम आंदोलनाला पाठिंबा दिलेला नाही. 'दिल्लीच्या सीमावर्ती भागांत सुरू असलेलं आंदोलन पूर्णपणे राजकीय झालं आहे. हे आंदोलन राजकीय अजेंड्याचा भाग आहे. कॅनडा, ब्रिटिशमधील राजकीय नेते, काही सेलिब्रिटी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे हे आंदोलन म्हणजे भारताविरोधात सुरू असलेला अजेंडा आहे. यामुळे देशाच्या शांततेला धोका निर्माण झाला आहे,' असं भारतीय किसान संघाचे राष्ट्रीय सचिव बद्री नारायण चौधरींनी सांगितलं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानrakesh tikaitराकेश टिकैतFarmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्ली