शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

१ ऑगस्टपासून रात्रीची संचारबंदी नाही; जाणून घ्या काय बंद, काय सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 06:59 IST

अनलॉक - ३ मध्ये जिम उघडणार; थिएटर, शाळा, कॉलेजवर बंदी कायम

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी अर्थव्यवस्था रुळावर यावी, यासाठी ५ ऑगस्टपासून काही निर्बंध मागे घेण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. या अनलॉक-३ साठी सरकाने नवीन नियमावली व मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

त्यानुसार ५ ऑगस्टपासून जिम सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून, रात्रीची संचारबंदीही उठविण्यात येणार आहे. मात्र, शाळा, महाविद्यालये, मेट्रो, रेल्वे आणि चित्रपटगृहे बंदच राहणार आहेत. देशात १ ऑगस्टपासून अनलॉक-३ लागू होईल. केवळ २५ टक्के क्षमतेवर चित्रपटगृहे सुरू करण्यास संमती दिली जाईल, अशी चर्चा होती. पण तूर्त चित्रपटगृहे बंद ठेवण्याचा निर्णय झाला. कोणत्याही राजकीय व धार्मिक कार्यक्रमांना राज्यांनी परवानगी देऊ नये, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.राज्ये व केंद्रशासित प्रदेशांशी आलेल्या सविस्तर चचेर्नुसार शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस ३१ आॅगस्टपर्यंत बंदच राहतील, असा निर्णयही घेण्यात आल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

या नियमावली प्रमाणे वंदे भारत मिशनअंतर्गत मोजक्या संख्येने आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाचीही परवानगी देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांसदर्भात सरकार नंतर निर्णय घेणार आहे. मेट्रो रेल्वे, सिनेमा गृहे, स्विमिंग पूल, थिएटर्स, बार, सभागृहे पूर्वीप्रमाणेच बंद राहतील. तसेच, कंटेनमेन्ट झोनमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन सुरूच राहील. सरकारचने ही सूट कंटेनमेंट झोनच्या बाहेरच्या भागात दिली आहे. कंटेनमेंट झोनसाठी घालण्यात आलेले निर्बंध तसेच कायमच असतील.

गृह मंत्रालयाने सांगितले, की ही नियमावली राज्ये व केंद्रशासित प्रदेशांकडून आलेल्या माहिती आणि शिफारशींचा आधारे तयार केली आहे. परिस्थितीनुसार निर्बंध कडक वा शिथिल करण्याची जबाबदारी संबंधुत राज्यांची असेल.गृह मंत्रालयाने जारी केलेल्या या नियमावलीत ६५ वर्षांहून अधिक वय असलेल्यां नागरिकांना, आजारांशी संघर्ष करत असलेल्यां नागरिकांना, गर्भवती महिलांना आणि १० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना घरातच राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. या शिवाय सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे सर्वांसाठी बंधनकारक आहे. विवाह समारंभांत ५० हून अधिक लोकांनी सहभागी होता येणार नाही, तर अंत्यविधीसाठीही जास्तीत जास्त २० जणच हजर राहू शकतील. 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक