नवा पक्ष स्थापणार नाही - मुकुल रॉय

By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:45+5:302015-02-15T22:36:45+5:30

कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल रॉय यांनी नवा पक्ष स्थापन करण्यासंबंधी वृत्त फेटाळले आहे. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पक्षात संघटनात्मक बदल करताना रॉय यांचे पंख छाटत त्यांचे दुसर्‍या क्रमांकाचे स्थान काढून घेण्याची प्रक्रिया चालविली आहे.

No new party will be formed - Mukul Roy | नवा पक्ष स्थापणार नाही - मुकुल रॉय

नवा पक्ष स्थापणार नाही - मुकुल रॉय

लकाता : तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल रॉय यांनी नवा पक्ष स्थापन करण्यासंबंधी वृत्त फेटाळले आहे. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पक्षात संघटनात्मक बदल करताना रॉय यांचे पंख छाटत त्यांचे दुसर्‍या क्रमांकाचे स्थान काढून घेण्याची प्रक्रिया चालविली आहे.
रॉय यांनी या घडामोडींवर भाष्य टाळले. वस्तुस्थितीला धरून नसलेल्या बाबींवर मी बोलणार नाही, एवढेच ते म्हणाले. ममता बॅनर्जी यांनी शनिवारी पक्षातील मोठे संघटनात्मक फेरबदलाची घोषणा केली. त्यांनी आपले खास निकटस्थ सुब्रत बक्षी यांची अतिरिक्त सरचिटणीस तर माजी केंद्रीय मंत्री दिनेश त्रिवेदी यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करीत रॉय यांचे पंख छाटल्याचे मानले जाते. या पार्श्वभूमीवर नाराज झालेल्या रॉय यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये भगदाड पाडून नवा पक्ष स्थापण्याची तयारी चालविल्याचे वृत्त होते.

Web Title: No new party will be formed - Mukul Roy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.