शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

इंजिनिअरिंगचे नवीन कॉलेज नकोत; देशभरात निम्म्याहून अधिक जागा राहतात रिकाम्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 05:51 IST

समितीने आपला अहवाल आमच्याकडे सोपविला आहे आणि यावर तंत्रशिक्षण नियामकांकडून विचार केला जात आहे.

नवी दिल्ली : दरवर्षी इंजिनिअरिंगच्या निम्म्याहून अधिक जागा रिकाम्या राहत असल्यामुळे २०२० पासून नव्या कॉलेजची स्थापना थांबविण्यात यावी, असा सल्ला आयआयटी हैदराबादचे अध्यक्ष बी.व्ही.आर. मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वातील सरकारी समितीने आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनला (एआयसीटीई) दिला आहे.एआयसीटीईचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे यांनी सांगितले की, समितीने आपला अहवाल आमच्याकडे सोपविला आहे आणि यावर तंत्रशिक्षण नियामकांकडून विचार केला जात आहे. आपल्या ४१ पानांच्या अहवालात असा सल्ला देण्यात आला आहे की, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक यासारख्या पारंपरिक क्षेत्रात अतिरिक्त जागांना मंजुरी देण्यात येऊ नये.ही शिफारस या आधारावर केली आहे की, पारंपरिक विषयात वर्तमान क्षमतेचा उपयोग ४० टक्के आहे, तर ६० टक्के कॉम्युटर सायन्स, एरोस्पेस आणि मेक्ट्रोनिक्समध्ये आहे. त्यामुळेच या समितीने कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, क्वांटम कॅम्युटिंग, डाटा सायन्स, सायबर सेक्युरिटी आणि थ्रीडी प्रिंटिंग अ‍ॅण्ड डिझाइनचे अंडरग्रॅज्युएट इंजिनिअरिंग प्रोगाम सुरू करण्यात यावेत.दर दोन वर्षांनी आढावाएका पाहणीत असे आढळून आले आहे की, २०१६-१७ मध्ये देशातील ३,२९१ इंजिनिअरिंग कॉलेजमधील १५.५ लाखपैकी ५१ टक्के जागा रिकाम्या राहिल्या होत्या.या समितीने असेही सुचविले आहे की, दर दोन वर्षांनी महाविद्यालयांची एकूण क्षमता आणि भरल्या जाणाऱ्या वा रिकाम्या राहणाºया जागा यांचा आढावा घ्यावा आणि त्यानुसार जागा कमी वा जादा करण्याचा निर्णय घेण्यात यावा.

टॅग्स :Educationशिक्षण