शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीच्या सुरक्षिततेबाबत काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही: रणदीप गुलेरिया

By जयदीप दाभोळकर | Updated: January 3, 2021 16:08 IST

सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या आपात्कालीन वापरासाठी आज देण्यात आली परवानगी

ठळक मुद्देकोविशिल्ड, कोवॅक्सिन लसीच्या आपात्कालिन परिस्थितीतल वापरास देण्यात आली परवानगीलसीबद्दल विचार करताना सुरक्षिततेची काळजीही घेतली जाते, गुलेरिया यांचं वक्तव्य

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआयने दोन कोरोना प्रतिबंधात्मक लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत डीसीजीआयने ही माहिती दिली. डीसीजीआयचे संचालक व्ही.जी. सोमाणी यांनी सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या आपात्कालीन वापरासाठी परवानगी दिली. यानंतर काही नेत्यांकडून लसीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. परंतु लसीच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही काळजी करण्याची गरज नसल्याचं मत एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केलं."हा देशासासाठी फार मोठा दिवस आहे आणि नववर्षांची सुरूवात करण्याचीही उत्तम पद्धत आहे. दोन्ही लसींची निर्मिती भारतातच झाली आहे हे ते कॉस्ट इफेक्टिव्हही आहेत. आपण लवकरच या लसी लाँच केल्या पाहिजेत," असं मत गुलेरिया यांनी व्यक्त केलं. "कोणत्याही लसीचा विचार करताना त्याच्या सुरक्षिततेबाबत सर्वतोपरी विचार केला जातो. यासाठीच लस निरनिराळ्या टप्प्यांतून जाते. यातूनच ती लस सुरक्षित आहे याची निश्चिती केली जाते. यानंतर आपण मानवी चाचणीकडे येतो. सर्व माहिती तज्ज्ञांद्वारे पाहिली जाते आणि त्यानंतरच लसीला मंजुरी दिली जाते," असंही त्यांनी स्पष्ट केलं. सुरूवातीला सीरमची लस देणारसुरूवाती टप्प्यात सीरम इन्स्टिट्यूटची लस दिली जाणार आहे. सीरमकडे सध्या ५० दशलक्ष डोस उपलब्ध आहेत. सुरूवातीच्या टप्प्यातील ३ कोटी लोकांच्या लसीकरणादरम्यान सीरम आपल्याला लसीचा पुरवठा करू शकतं. जसजसं आपण पुढे जाऊ तसा भारत बायोटेकच्या लसीच्या डेटादेखील उपलब्ध असणार असल्याचं गुलेरिया यांनी नमूद केलं.  "सध्या लसीच्या आपात्कालिन वापरास परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच लसींची चाचणी सुरू ठेवणं आणि त्यांचा डेटा मिळवत राहणं आवश्यक आहे. एकदा अधिक डेटा आल्यानंतर आपल्याला त्या लसीच्या सुरक्षिततेबाबत अधिक आत्मविश्वास येईल," असंही गुलेरिया यांनी नमूद केलं. "जर आपात्कालिन परिस्थितीत जर रुग्णांची संख्या अचानक वाढू लागली तर अशा परिस्थितीत आपल्याला लसीकरणाची गरज भासेल. त्यावेळी भारत बायोटेकच्या लसीचाही वापर केला जाईल. अशा परिस्थितीत सीरम इन्स्टिट्यूटची लस किती प्रभावी ठरेल याची खात्री नसेल तेव्हादेखील याचा बॅकअप म्हणून वापर करता येऊ शकेल," असंही ते म्हणाले.सुरूवातीला सीरमची लस देणारसुरूवाती टप्प्यात सीरम इन्स्टिट्यूटची लस दिली जाणार आहे. सीरमकडे सध्या ५० दशलक्ष डोस उपलब्ध आहेत. सुरूवातीच्या टप्प्यातील ३ कोटी लोकांच्या लसीकरणादरम्यान सीरम आपल्याला लसीचा पुरवठा करू शकतं. जसजसं आपण पुढे जाऊ तसा भारत बायोटेकच्या लसीच्या डेटादेखील उपलब्ध असणार असल्याचं गुलेरिया यांनी नमूद केलं. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAIIMS hospitalएम्स रुग्णालयIndiaभारत