पासपोर्टसाठी वडिलांच्या नावाची गरज नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2016 04:23 IST2016-05-22T04:23:00+5:302016-05-22T04:23:00+5:30
काही प्रकरणांमध्ये पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या आईचे नाव असणे पुरेसे आहे. वडिलांच्या नावाची गरज नाही. एकटी आई ही पालकही असू शकते

पासपोर्टसाठी वडिलांच्या नावाची गरज नाही
नवी दिल्ली : काही प्रकरणांमध्ये पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या आईचे नाव असणे पुरेसे आहे. वडिलांच्या नावाची गरज नाही. एकटी आई ही पालकही असू शकते, असा महत्त्वपूर्ण निवाडा दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. एकल पालक असलेल्या एका मुलीचा पासपोर्ट अर्ज स्वीकारण्याचे आणि तिला वडिलांचे नाव सांगण्याची सक्ती न करण्याचे निर्देश न्यायमूर्ती मनमोहन यांनी या आठवड्याच्या प्रारंभी दिले होते.