यापुढे Bombay नाही Mumbai High court
By Admin | Updated: July 5, 2016 16:35 IST2016-07-05T16:09:10+5:302016-07-05T16:35:31+5:30
मुंबई बरोबरच कलकता हायकोर्टाचे कोलकाता उच्च न्यायालय आणि मद्रास हायकोर्टाचे चेन्नई उच्च न्यायालय असे नाव बदलायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

यापुढे Bombay नाही Mumbai High court
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यतेखाली मंगळवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई हायकोर्ट असे नामकरण करण्यास मंजुरी देण्यात आली. मुंबई बरोबरच कलकता हायकोर्टाचे कोलकाता हायकोर्ट आणि मद्रास हायकोर्टाचे चेन्नई हायकोर्ट असे नाव बदलायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यामुळे यापुढे बॉम्बे हायकोर्ट आणि मुंबई हायकोर्ट म्हणून ओळखले जाईल.
१९९५ साली बॉम्बे शहराचे मुंबई असे नामकरण झाले. पण त्यानंतरही बॉम्बे हायकोर्टाच्या नावात बदल झाला नाही. बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई हायकोर्ट असे नामकरण करावे अशी शिवसेनेची मागणी होती. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपचे युती सरकार १९९५ मध्ये पहिल्यांदा सत्तेवर आले त्यावेळी बॉम्बे शहराचे नाव बदलून मुंबई असे नामकरण झाले.
दक्षिण मुंबईचे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी या मुद्यावर केंद्रीय कायदामंत्री सदानंद गौडा यांचीही भेट घेतली होती. बॉम्बे आता मुंबई म्हणून ओळखली जाते. त्यामुळे सरकारी संस्थांना जुनी नावे नको असे सावंत म्हणाले होते. आयआयटी-बॉम्बेच्या नावातही मुंबईचा समावेश करावा अशी शिवसेनेची मागणी आहे.