शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

भ्रष्टाचारी कितीही माेठा असाे, कारवाई हाेणारच! मेरठच्या सभेतून मोदींचा विरोधी आघाडीवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 10:34 IST

Narendra Modi News: “भ्रष्टाचाराविरुद्ध मोठी लढाई लढतोय, आपल्यावरील हल्ल्यांमुळे भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई थांबणार नाही, भ्रष्टाचारात गुंतलेल्यांवर कारवाई केली जाईल,” अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी विरोधी ‘इंडिया’ आघाडीवर केली.

मेरठ (उत्तर प्रदेश) : “भ्रष्टाचाराविरुद्ध मोठी लढाई लढतोय, आपल्यावरील हल्ल्यांमुळे भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई थांबणार नाही, भ्रष्टाचारात गुंतलेल्यांवर कारवाई केली जाईल,” अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी विरोधी ‘इंडिया’ आघाडीवर केली. “जेव्हा आपण भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई पूर्ण ताकदीने लढत आहोत, तेव्हा या लोकांनी ‘इंडिया’ आघाडी केली आहे. त्यांना वाटते की ते मोदी त्यांना घाबरतील, परंतु माझ्यासाठी, माझा भारत माझा परिवार आहे आणि मी भ्रष्टाचारापासून संरक्षण करण्यासाठी पावले उचलत आहे,” असे ते उत्तर प्रदेशातील मेरठ येथील सभेत म्हणाले.

“भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करत असल्याने काही लोक नाराज झाले आहेत. मी माझ्या देशाला भ्रष्टाचाऱ्यांपासून वाचवण्यासाठी एक मोठी लढाई लढत आहे. मोठमोठे भ्रष्टाचारी आज तुरुंगात आहेत आणि सर्वोच्च न्यायालयातूनही त्यांना जामीन मिळत नाही,” हे मोदी यांनी निदर्शनास आणून दिले. 

“ही निवडणूक दोन गटांतील लढाई आहे. एकीकडे एनडीए भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कटिबद्ध आहे, तर दुसरीकडे भ्रष्ट नेत्यांच्या संरक्षणावर लक्ष केंद्रित करणारी ‘इंडिया’ आघाडी आहे. भ्रष्टाचार हटवायचा की नाही हे तुम्हाला ठरवायचे आहे. ज्यांनी लूट केली आहे, ती देशाला परत द्यावी लागेल, ही मोदींची ‘गॅरंटी’ आहे”, असे ते म्हणाले.

या जाहीर सभेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्यासह  दूरचित्रवाणी मालिका ‘रामायण’ फेम ज्येष्ठ अभिनेते आणि मेरठ लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अरुण गोविल उपस्थित होते. 

१० वर्षात विकासाचा फक्त ट्रेलर पाहिला....२०२४ ची निवडणूक केवळ सरकार बनवण्यासाठी नाही तर ‘विकसित भारत’ बनवण्यासाठी आहे, आमच्या सरकारने तिसऱ्या कारकिर्दीची तयारी सुरू केली आहे. पहिल्या १०० दिवसात कोणते मोठे निर्णय घ्यायचे आहेत यावर काम सुरू आहे. १० वर्षात तुम्ही विकासाचा फक्त ट्रेलर पाहिला आहे, आता देशाला खूप पुढे न्यायचे आहे, असे माेदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४INDIA Opposition Allianceइंडिया आघाडी