शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणात कोणतंही 'If and But' नको; जाणून घ्या का म्हणाले पंतप्रधान मोदी असं ?

By जयदीप दाभोळकर | Updated: January 11, 2021 19:21 IST

या व्यापक लसीकरण मोहिमेत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी एकत्र काम करण्याची आवश्यकता, पंतप्रधानांचं वक्तव्य

ठळक मुद्दे१६ जानेवारीपासून देशभरात सुरू होणार लसीकरण मोहीमदेशातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये यशस्वीरित्या ड्राय रन पूर्ण

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं सीरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेकच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या आपात्कालिन वापरास मंजुरी दिली होती. आता येत्या १६ जानेवारीपासून देशभरात कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात होणार आहे. तसंच सुरूवातीच्या टप्प्यात ३ कोटी आरोग्य सेवा कर्मचारी आणि फ्रन्टलाईन वर्कर्सना ही लस दिली जाणार आहे. लसीकरणापूर्वी त्यांनी आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली. तसंच आपल्या संबोधनादरम्यान लसीकरणाची तयारी पूर्ण झाली असून याबाबत कोणतीही शंका नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच या व्यापक लसीकरण मोहिमेत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी एकत्र काम करण्याची आवश्यकता असल्याचं मोदी म्हणाले.भारताची कोरोनाविरोधातील लढाई आता एका निर्णायक टप्प्यात प्रवेश करत आहे. आपण १६ जानेवारीपासून जगातील सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करत आहोत, असं मोदी यावेळी म्हणाले. तसंच त्यांनी कोरोनाचा सामना केल्याबद्दल आपल्या सरकारचं कौतुकही केलं. या मोठ्या संकटादरम्यान सर्वांनी एकत्र मिळून काम केलं. लवकर निर्णयही घेतले गेले. दुसऱ्या देशांच्या तुलनेत भारतात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

"लसीकरणाबाबत कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरण्यापासून त्या रोखण्याची जबाबदारी ही राज्यांची आहे. आपल्या सतर्क राहावं लागणार असून अफवा पसरण्यापासून थांबवाव्या लागतील," असंही ते म्हणाले. देशातील आणि जगातील काही घटक या मोहिमेत बाधा आणण्याचे प्रयत्न करतील. परंतु अशा प्रत्येक प्रयत्नांना देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत योग्य माहिती पोहोचवून त्यांचे प्रयत्न हाणून पाडायचे आहेत," असंही त्यांनी सांगितलं. ज्या लसींच्या आपात्कालिन वापरासाठी परवानगी दिली आहे त्या स्वदेशी बनावटीच्या आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. भारताच्या जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये ड्राय रन पूर्ण करण्यात आला आहे. ही एक मोठी बाब आहे. तसंच आपल्या जुन्या अनुभवातून नव्या एसओपींना पुढे नेत असल्याचंही पंतप्रधान म्हणाले. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतHealthआरोग्य