शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

...ताेपर्यंत घरवापसी नाहीच; शेतकरी ठाम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 06:54 IST

Farmer Protest : चर्चेची ८वी फेरीही निष्फळ. मागच्या वेळच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी लंगरमधून आलेल्या जेवणाचा आस्वाद मंत्रिगटाने घेतला होता. मात्र, सोमवारच्या बैठकीत उभय पक्षांनी सहभोजनाला प्राधान्य दिले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : शेतीविषयक कायदे रद्द करण्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात निर्माण झालेला तिढा अद्याप कायम आहे. सोमवारी उभयतांमध्ये झालेल्या चर्चेची आठवी फेरी निष्फळ ठरली. आता पुन्हा ८ जानेवारी रोजी उभय पक्षांमध्ये बैठक होणार आहे. 

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि वाणिज्य राज्यमंत्री सोम प्रकाश या मंत्रिगटाने सोमवारी ४० शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी विज्ञान भवन येथे चर्चा केली. उभयतांमध्ये होणारी ही चर्चेची आठवी फेरी होती. चार तास चाललेल्या या बैठकीत केंद्राने तीनही कायदे रद्द करावेत, हा आग्रह शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी कायम ठेवला, तसेच किमान हमीभावाच्या (एमएसपी) मुद्द्यावरही चर्चा झाली. कृषी कायदे रद्द न करण्याच्या निर्णयावर मंत्रिगट ठाम राहिला. दोन्हीकडच्या सदस्यांचा समावेश असलेली एक समिती नेमून या संदर्भात सन्माननीय तोडगा काढला जावा, असा पर्याय मंत्रिगटाने सुचविला. मात्र, शेतकरी संघटनांनी तो धुडकावून लावला. चार तास चाललेली चर्चा निष्फळ ठरल्याने, आता ८ जानेवारीला पुन्हा एकदा बैठक घेण्याचे ठरले आहे. 

सहभोजनाकडे पाठ मागच्या वेळच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी लंगरमधून आलेल्या जेवणाचा आस्वाद मंत्रिगटाने घेतला होता. मात्र, सोमवारच्या बैठकीत उभय पक्षांनी सहभोजनाला प्राधान्य दिले नाही. जेवणाच्या सुट्टीदरम्यान शेतकरी संघटनांचे नेते लंगरमधून आलेले जेवण घेत होते, तर मंत्रिगट दुसऱ्या कोपऱ्यात चर्चेत गुंतला असल्याचे दृश्य विज्ञान भवनात होते. 

चर्चेवेळी वातावरण चांगले होते. शेतकरी संघटनांच्या नेत्यांचा दृष्टिकोन सकारात्मक होता. शेतकऱ्यांचा केंद्र सरकारवर विश्वास आहे, म्हणूनच ते चर्चेला प्रतिसाद देतात. आता पुढील बैठक ८ जानेवारीला होणार आहे. त्यात कृषी कायदे आणि एमएसपी हे दोन मुद्दे असतील. सरकारला देशभरातील शेतकऱ्यांचा विचार करून चर्चा करायची आहे. दोन्ही बाजूंनी सन्माननीय तोडगा निघण्याची आशा आहे. टाळी शेवटी दोन्ही हातानेच वाजते. - नरेंद्रसिंह तोमर, केंद्रीय कृषिमंत्री 

    कंत्राटी शेतीमध्ये रस नाही : रिलायन्सn कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांनी राज्यांतील रिलायन्स जिओचे मोबाइल टॉवर्सची नासधूस केली. या विरोधात रिलायन्स कंपनीने दोन्ही राज्यांतील हायकोर्टात धाव घेतली आहे. n पंजाब आणि हरयाणातील सरकारांना आमच्या मालमत्तांचे रक्षण करण्याचे निर्देश देण्यात यावे, अशी मागणी रिलायन्सने केली आहे, तसेच रिलायन्सने कधीच कंत्राटी शेती केली नाही आणि भविष्यातही तसे काही करण्याचे प्रयोजन नाही, असेही रिलायन्सकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जोपर्यंत केंद्र सरकार तीनही कायदे रद्द करत नाही, तोपर्यंत आम्ही घरी परत जाणार नाही. एमएसपीला कायद्याचे स्वरूप देण्याच्या मुद्द्यावरूनही एकमत झालेले नाही. आता ८ जानेवारीला होणाऱ्या बैठकीत एमएसपी आणि कायदे रद्द करणे या दोन मुद्द्यांवरच चर्चा होईल.     - राकेश टिकैत, शेतकरी नेते

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरी