शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

CoronaVirus News: ...तसा कुठलाच पुरावा नाही! WHOच्या स्पष्टीकरणानं सगळ्यांची चिंता वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 12:05 PM

CoronaVirus News: देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना, रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाला असताना WHOचं चिंता वाढवणारं स्पष्टीकरण

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे. गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 1,61,736 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 879 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,36,89,453 वर पोहोचली आहे.  कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिविरचा वापर केला जात आहे. त्यामुळे रेमडेसिविरचा तुटवडा जाणवू लागला आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) स्पष्टीकरणामुळे चिंतेत भर पडली आहे.स्पुटनिक व्ही लसीला DCGIची मंजुरी; जाणून घ्या किंमत अन् कितपत प्रभावीकोरोना रुग्णांच्या उपचारात रेमडेसिविर प्रभावी ठरत असल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचं डब्ल्यूएचओनं म्हटलं आहे. देशात रेमडेसिविरची मागणी वाढत असताना, त्यासाठी काळाबाजार होत असताना डब्ल्यूएचओकडून आलेलं स्पष्टीकरण महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारात होत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या वापरावर डब्ल्यूएचओनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. कोरोनाच्या उपचारांत रेमडेसिविर उपयोगी ठरत असल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचं डब्ल्यूएचओनं सांगितलं आहे.बापरे! अवघ्या 11 दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण; देण्यात आलं Remdesivir इंजेक्शन, प्रकृती चिंताजनकडब्ल्यूएचओच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन आणि कोविड तांत्रिक टीमच्या प्रमुख डॉय मारिया वेन केरखोव यांनी रेमडेसिविर इंजेक्शनच्या वापरावर प्रश्न उपस्थित केले. 'रेमडेसिविर इंजेक्शनच्या पाच चाचण्या झाल्या आहेत. मात्र त्यातून ना कोरोना रुग्ण बरे झाल्याचं निष्पन्न झालंय ना मृतांचा आकडा कमी झाल्यानं दिसून आलंय. सध्या आम्ही एका मोठ्या चाचणीची वाट पाहात आहोत. त्या चाचणीच्या अहवालातून रेमडेसिविरच्या परिणामकारकतेवर स्पष्टपणे भाष्य करता येईल,' असं स्वामीनाथन आणि केरखोव यांनी सांगितलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या