शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

एकही भाविक कुंभमेळ्यात राहणार नाही उपाशी; प्रयागराजमध्ये प्रत्येकाला मिळेल मोफत भोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 11:22 IST

पुण्य मिळविण्यासाठी अनेक संस्था करणार अन्नदान; आज सुरू होणार श्रद्धेचा महाकुंभ

- राजेंद्र प्रसादप्रयागराज : प्रयागराजमधील संगमावर जगातील सर्वांत मोठे तंबूचे शहर तयार झाले आहे. या संगमाच्या काठावर सोमवारपासून श्रद्धेचा सर्वांत मोठा महाकुंभ सुरू होत आहे.  या महाकुंभात देशभरातून आणि जगाच्या कोनाकोपऱ्यांतून सुमारे ४० ते ४५ कोटी भाविक त्रिवेणीच्या पवित्र संगमात स्नान करण्यासाठी येणार आहेत. 

जगातील या सर्वांत मोठ्या धार्मिक सोहळ्यात स्नानाबरोबरच दानालाही विशेष महत्त्व आहे. येथे विशेषत: अन्नदान मोठ्या प्रमाणात केले जाते. यामुळेच या भव्य सोहळ्यात शेकडो संस्था महाकुंभ मेळाव्यात अन्नदान करणार आहेत. यासोबतच सनातन धर्माचा ध्वज वाहणारे १३ आखाडेही आपापल्या छावण्यांमध्ये भाविकांना अन्नदान करणार आहेत. या मोफत अन्नदानामुळे महाकुंभ मेळाव्यात एकही भाविक उपाशी राहणार नाही.

शेकडो रोट्या एकाच वेळी भाजल्या जातातप्रत्येक आखाड्याच्या स्वयंपाकघरात दररोज चार ते पाच हजार लोकांसाठी भंडारा तयार केला जातो. सुमारे ७० ते ८० जणांची टीम आणि दीड ते दोन डझन स्वयंपाकी भंडारा तयार करतात. प्रत्येक आखाड्याने स्वयंपाकासाठी देशी तुपापासून मसाल्यापर्यंत सर्व काही आणले आहे. वेगवेगळ्या राज्यातील शेफ जगभरातील पदार्थ तयार करतात. ऋषी-मुनींना उत्तम भोजन मिळणे हे त्यांच्या साधनेचे आणि कुंभमेळ्याचे पुण्य आहे, असे हे स्वयंपाकी सांगतात.

रांगेत लहान-मोठा असा कोणीही नाही१३ आखाड्यांच्या छावणीत जमलेल्या भाविकांच्या रांगेत कोणीही लहान-मोठा नाही. सर्व भाविकांना एकाच रांगेत जेवण आणि प्रसाद मिळतो. या रांगेत ऋषी-मुनी यांच्या व्यतिरिक्त सर्व सामान्य भक्त आणि साधकही आहेत. आखाड्यांमध्ये सुरुवातीपासून भंडारा संपेपर्यंत कोणीही उभा राहू शकतो. या आखाड्याच्या स्वयंपाकघरात फक्त पुरी-भाजी आणि खिचडीच नाही तर डोसा, छोले-भटुरे, रोट्या, हलवा आणि मिठाईही तयार केली जाते. निरंजनी आखाड्याच्या महंतांनी सांगितले की, साधूंच्या आवडीनुसार जेवण तयार केले जाते.निर्मल पंचायती आखाड्यात सांगितले गेले की, साधूसंतांना त्यांच्या आवडीचे जेवण मिळावे यासाठी पिन्नीपासून श्रीखंडापर्यंत विविध मिठाई बनविल्या जातात, तर बडा उदासीन आखाड्यात भाज्यांसारखे इतर पदार्थही रोज बदलतात, इथे पकोडे, हलवा, जिलेबी, इमरती असे पदार्थ न्याहारीसाठी केले जातात.

महाकुंभात पुतळा अन् वादराष्ट्रपती, पंतप्रधान आणि विविध राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री संगममध्ये स्नान करण्यासाठी येणार आहेत. समाजवादी पार्टी (सपा) समर्थकांनी महाकुंभ परिसरातील सेक्टर १६ मध्ये सपा संस्थापक आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री मुलायम सिंह यादव यांचा पुतळा बसविला आहे. त्यावरून वाद सुरू झाला आहे.

४,०००हेक्टरवर यावेळी कुंभमेळा आयोजित करण्यात आला आहे. यंदा कुंभमेळ्याचे क्षेत्रफळ जवळजवळ २५ टक्क्यांनी वाढले आहे.१२किलोमीटर लांबी घाटांची यावेळी आहे. मागील वेळी ती ८ किलोमीटर होती.१८५०हेक्टरपर्यंत पार्किंग क्षेत्र यावेळी वाढविण्यात आले आहे. २०१९ मध्ये ते १२९१ हेक्टर होते.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेश