फ्लिपकार्टच्या ग्राहकांसाठी "No Cost EMI" चा पर्याय
By Admin | Updated: May 31, 2016 21:11 IST2016-05-31T18:43:18+5:302016-05-31T21:11:19+5:30
ऑनलाइन विश्वासातील ई-कॉमर्स साइट असलेल्या फ्लिपकार्टने आपल्या ऑनलाइन ग्राहकांसाठी एक नवीन पर्याय आणला आहे.

फ्लिपकार्टच्या ग्राहकांसाठी "No Cost EMI" चा पर्याय
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - ऑनलाइन विश्वातील ई-कॉमर्स साइट असलेल्या फ्लिपकार्टने आपल्या ऑनलाइन ग्राहकांसाठी एक नवीन पर्याय आणला आहे.
ग्राहकांना कोणत्याही वस्तूची खरेदी करताना स्वस्तात मिळावी यासाठी फ्लिपकार्टने एक आकर्षित आर्थिक पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. "No Cost EMI" असा पर्याय दिला असून यामुळे ग्राहकांना वस्तू खरेदी करताना आता अतिरिक्त खर्चाचा भार पडणार नसल्याचे समजते. कारण, ग्राहकांसाठी बिनव्याजी आणि झिरो डाऊन पेमेन्टवर वस्तू खरेदी करता येणार आहे.
जनतेला स्वतात ऑनलाइन खरेदी करता यावी, यासाठी आम्ही पहिल्यांदाच असा निर्णय घेल्याचे फ्लिपकार्टने म्हटले आहे.