माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकावरून सध्या वाद सुरू आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत पुस्तकाच्या काही भागाचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. दरम्यान, आता पुस्तकाचे प्रकाशक पेंग्विन यांनी निवेदन जारी केले आहे.
पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने सोमवारी सांगितले की, माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या आत्मचरित्र "फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी" चे विशेष प्रकाशन अधिकार त्यांच्याकडे आहेत आणि हे पुस्तक अद्याप प्रकाशित झालेले नाही असे स्पष्ट केले आहे. परवानगीशिवाय प्रती प्रसारित केल्या जात असल्याच्या बातम्या येत आहेत.
'कोणतीही प्रत प्रसिद्ध केलेली नाही'
डिजिटल आणि इतर स्वरूपात हस्तलिखिताच्या कथित बेकायदेशीर प्रसाराबाबत दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर हे स्पष्टीकरण देण्यात आले. एका निवेदनात, प्रकाशन गृहाने स्पष्ट केले की पुस्तकाची कोणतीही प्रत जनतेसाठी प्रसिद्ध केलेली नाही.
"पेंग्विन रँडम हाऊस इंडिया हे स्पष्ट करू इच्छिते की माजी भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचे आत्मचरित्र 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' चे प्रकाशन अधिकार आमच्याकडे आहेत. आम्ही स्पष्ट करू इच्छितो की हे पुस्तक अद्याप प्रकाशित झालेले नाही, असंही निवेदनात म्हटले आहे.
कंपनीने पुस्तकाची कोणतीही प्रत प्रकाशित, वितरित, विकली किंवा जनतेसाठी उपलब्ध करून दिलेली नाही, असंही त्यांनी यामध्ये म्हटले आहे.
प्रकाशकाने ही चेतावणी दिली
सध्या प्रचलित असलेल्या पुस्तकाची कोणतीही आवृत्ती, पूर्ण किंवा अंशतः, आणि कोणत्याही स्वरूपात (मुद्रित, पीडीएफ किंवा ऑनलाइन प्रत), कॉपीराइट उल्लंघन मानली जाईल, प्रकाशकाने असा इशाराही दिला.
Web Summary : Penguin clarifies it holds rights to Gen. Naravane's memoir, 'Four Stars of Destiny,' not yet published. They haven't released any copies, warning against unauthorized distribution, following an FIR about illegal manuscript circulation.
Web Summary : पेंगुइन ने स्पष्ट किया कि उसके पास जनरल नरवणे की आत्मकथा 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' के अधिकार हैं, जो अभी प्रकाशित नहीं हुई है। उन्होंने कोई भी प्रति जारी नहीं की है, और पांडुलिपि के अवैध प्रसार पर एफआईआर के बाद अनधिकृत वितरण के खिलाफ चेतावनी दी है।