शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
2
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
3
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
4
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
5
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
6
T20 World Cup 2024: सुपर आठमध्ये अनपेक्षित निकाल शक्य
7
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
8
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
9
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
10
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
11
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
12
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
13
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
14
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
15
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
16
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
17
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
18
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
19
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
20
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!

भाषण संपवून जाताना राहुल गांधींनी फ्लाइंग किसचा इशारा केला...; स्मृती इराणी यांचा गंभीर आरोप!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2023 3:18 PM

"त्यांनी (राहुल गांधी) ज्या संसदेत फ्लाइंग किसचा इशारा केला, त्या संसदेत महिला सदस्यही आहेत. असे आचरण केवळ एक स्त्रीयांप्रति द्वेष असणारी व्यक्तीच करू शकते."

लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान आज राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. भाषण संपल्यानंतर ते सभाग्रूहातून निघून गेले. यानंतर, केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी आपल्य भाषणात राहुल गांधींवर जरदोरा हल्ला चढवला. स्मृती म्हणाल्या, आपले भाषण संपवून सभागृहातून बाहेर जाताना राहुल गांधींनी फ्लाइंग किसचे इशारे  केले.

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती ईरानी म्हणाल्या, येथे माझ्या आधी ज्यांना बोलायची संधी देण्यात आली त्यांनी आज असभ्यपणाचा परिचय दिला आहे. त्यांनी आपले भाषण संपल्यानंतर, असभ्य वर्तन केले. त्यांनी ज्या संसदेत फ्लाइंग किसचा इशारा केला, त्या संसदेत महिला सदस्यही आहेत. असे आचरण केवळ एक स्त्रीयांप्रति द्वेष असणारी व्यक्तीच करू शकते. एवढेच नाही, तर असे असभ्य आचरण या देशाच्या सदेत कधीही दिसले नाही. हे त्या खानदानाचे लक्षण आहे, हे आज देशाला समजले, असेही स्मृती म्हणाल्या.

महिला खासदारांनी केली अध्यक्षांकडे तक्रार -यासंदर्भात भाजप खासदार पूनम महाजन म्हणाल्या, राहुल गांधी यांनी आज सभागृहात केलेले कृत्य असंसदीय आहे. आम्ही याचा धिक्कार करत असून लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार करणार आहोत. यानंतर महिला खासदारांच्या एका गटाने राहुल गांधींच्या या कृत्याची तक्रार लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे.

राहुल गांधींवर पलटवार - संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार विरोधात अविश्वास प्रस्तावावर चर्चा करताना राहुल गांधींनी मोदी सरकारवर बोचऱ्या शब्दांत टीका केली. यानंतर, राहुल गांधींच्या भाषणावर पलटवार करताना स्मृती म्हणाल्या, "देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतमातेच्या हत्येची चर्चा झाली. त्यातही अशा विधानांवर काँग्रेस पक्ष इथे बाकं वाजवत होता, टाळ्या वाजवत राहिला. भारतमातेच्या हत्येच्या गोष्टींवर टाळ्या वाजवून यांनी साऱ्या देशाला सूचित केले की नक्की कोणाच्या मनात विश्वासघाताची भावना आहे." 

"मणिपूरचे तुकडे अजिबात झालेले नाहीत, तो विभागलेला नाही. तो अजूनही देशाचाच भाग आहे. पण तुमच्या मित्र पक्षाचे नेते तामिळनाडूत म्हणाले की, भारत म्हणजे फक्त उत्तर भारत. राहुल गांधी, तुमच्यात हिंमत असेल तर द्रमुकच्या सहकाऱ्याचे खंडन करून दाखवा. काश्‍मीर भारतापासून वेगळे करण्‍याची चर्चा करण्याची भाषा करणाऱ्या काश्मीरमधील काँग्रेस नेत्यांचा  विरोध करून दाखवा," अशा शब्दांत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना आव्हान दिले." 

टॅग्स :ParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनSmriti Iraniस्मृती इराणीRahul Gandhiराहुल गांधीNo Confidence motionअविश्वास ठराव