शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

विमान प्रवाशांना केंद्र सरकार देणार मोठी भेट, बघा कसा होणार फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 15:41 IST

नागरी विमान वाहतूक खात्याने काही नव्या नियमांचा मसुदा तयार केला आहे.

नवी दिल्लीः विमान कंपन्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे विमान उड्डाणाला खूपच उशीर झाला आणि एखाद्या प्रवाशानं तिकीट रद्द करायचं ठरवलं, तर यापुढे त्याला तिकिटाचे सगळे पैसे परत देणं कंपनीवर बंधनकारक राहील, अशी तरतूद केंद्र सरकार लवकरच करणार आहे. नागरी विमान वाहतूक खात्याने काही नव्या नियमांचा मसुदा तयार केला असून त्यावर मतं मागवण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी दिली. पुढच्या दोन महिन्यात हे नियम लागू करण्याचा सरकारचा विचार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

'कॅन्सलेशन चार्ज'मध्ये दिलासादायक बदल विमानाचं तिकीट काढल्यानंतर २४ तासांच्या आत ते रद्द केल्यास कुठलंही शुल्क (कॅन्सलेशन चार्ज) द्यावं लागणार नाही. या कालावधीत तिकिटामध्ये अन्य काही बदल करायचा असेल तर तोही कंपनीला मोफत करून द्यावा लागेल, अशी खुशखबर जयंत सिन्हा यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रवास सुरू करायच्या ९६ तास आधी तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना कुठलाही भुर्दंड सोसावा लागणार नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. त्याचप्रमाणे, बेसिक फेअर आणि फ्युएल चार्जेस मिळून जेवढी रक्कम होते, त्यापेक्षा अधिक रक्कम 'कॅन्सलेशन चार्ज' म्हणून आकारता येणार नाही, असा चाप विमान कंपन्यांना लावला जाणार आहे.

विमानाला विलंब झाल्यास मिळणार नुकसानभरपाई

विमान कंपनीच्या चुकीमुळे विमानाला विलंब झाल्यास, त्या कंपनीला प्रवाशांना नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. विमान उड्डाण दुसऱ्या दिवसापर्यंत रखडल्यास कुठलंही अतिरिक्त शुल्क न घेता प्रवाशांची व्यवस्था हॉटेलमध्ये करणं कंपन्यांना बंधनकारक केलं जाणार आहे.

विमानाला उशीर झाला आणि 'कनेक्टिंग फ्लाइट' चुकलं तरी प्रवाशांना कंपनीकडून ठरावीक रक्कम दिली जाईल. विमान खूपच रखडलं आणि प्रवाशानं तिकीट रद्द करायचं ठरवलं, तर त्याला आता पूर्ण पैसे परत मिळू शकतील. 

दिव्यांग प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा या हेतूने, लेग स्पेस जास्त असलेली आसनं त्यांच्यासाठी राखून ठेवण्यात येणार आहेत. तसंच, पेपरलेस प्रवासाच्या दृष्टीने प्रवाशांना एक यूनिक नंबर देण्याचा प्रस्तावही या मसुद्यात आहे.

टॅग्स :airplaneविमानCentral Governmentकेंद्र सरकारTravelप्रवास