शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीशांना धमक्यांची सीबीआय चौकशीच नाही, सर्वोच्च न्यायालयाची तीव्र शब्दांत नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 07:43 IST

Supreme Court News: देशात कुख्यात गुंड तसेच नामवंत माणसांनी न्यायाधीशांना धमकाविल्याची प्रकरणे घडली आहेत. त्यातील काही प्रकरणांची सीबीआयने चौकशी करावी, असा कोर्टाने आदेश देऊनही सीबीआयने काहीही केलेले नाही, अशी तीव्र नाराजी सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली.

नवी दिल्ली : देशात कुख्यात गुंड तसेच नामवंत माणसांनी न्यायाधीशांना धमकाविल्याची प्रकरणे घडली आहेत. त्यातील काही प्रकरणांची सीबीआयने चौकशी करावी, असा कोर्टाने आदेश देऊनही सीबीआयने काहीही केलेले नाही, अशी तीव्र नाराजी सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली. धनबादमधील जिल्हा न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या मृत्यू प्रकरणाची आता सीबीआय चौकशी करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, न्यायाधीशांना मिळत असलेल्या धमक्यांप्रकरणी सीबीआयने वेगाने तपास केला पाहिजे. २०१९ सालीही न्यायाधीशांना धमकी दिल्याचे एक प्रकरण घडले होते. त्यावेळी केंद्र सरकारने कोर्टाला उत्तरच सादर केले नव्हते. धनबाद प्रकरणाबाबत उत्तर दाखल करण्यासाठी केंद्राला एक आठवड्याची मुदत दिली आहे. कोर्टाने सांगितले की, काही गुंड तसेच नामवंत माणसे कनिष्ठ व उच्च न्यायालयांतील न्यायाधीशांना धमक्या देतात. शारीरिक वा मानसिक त्रास देतात. व्हॉट्सॲप, फेसबुकवर धमकी देण्यापर्यंत काही जणांची मजल जाते. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा ॲटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांना म्हणाले की, झारखंडमधील जिल्हा न्यायाधीशांच्या हत्येप्रकरणीच्या तपासात केंद्रा सहकार्य हवे आहे. त्यावर झारखंडच्या वकिलाने सांगितले की, न्या. उत्तम आनंद यांच्या हत्येच्या दिवशीच याच्या चौकशीसाठी सरकारने एसआयटी स्थापना केली आहे. त्या प्रकरणी २ जणांना अटक करून त्यांची चौकशी केली जात आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी शिफारस ३० जुलै रोजी करण्यात आली.  

न्यायाधीशांना सुरक्षा पुरविणे आवश्यकn सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी सांगितले की, न्यायाधीश उत्तम आनंद यांचा ज्या पद्धतीने मृत्यू झाला ती सारी घटनाच दुर्दैवी आहे. n धनबादमध्ये कोळसामाफियांचे वर्चस्व आहे. अशा माहोलमध्ये या न्यायाधीशांना सुरक्षा व्यवस्था पुरवायला हवी होती. ते झाले नाही. हे झारखंड सरकारचे अपयश आहे. न्यायाधीश उत्तम आनंद प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वत: हून दखल घेतली. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय