बोगस मतदार २ लाख ३२ हजार पत्ते सापडलेच नाहीत : मतदार यादीतून नावे वगळण्यात येणार
By Admin | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:32+5:302015-07-10T23:13:32+5:30
नवी मुंबई : ऐरोली व बेलापूर मतदारसंघामध्ये तब्बल २ लाख ३२ हजार ५९१ मतदार बोगस असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. या मतदारांचे पत्ते व इतर पुरावे सापडलेले नाहीत. निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या सूचनेवरून ही नावे वगळण्यात येणार असून, सर्वच राजकीय पक्षांना हा धक्का असल्याचे मानले जात आहे.

बोगस मतदार २ लाख ३२ हजार पत्ते सापडलेच नाहीत : मतदार यादीतून नावे वगळण्यात येणार
न ी मुंबई : ऐरोली व बेलापूर मतदारसंघामध्ये तब्बल २ लाख ३२ हजार ५९१ मतदार बोगस असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. या मतदारांचे पत्ते व इतर पुरावे सापडलेले नाहीत. निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या सूचनेवरून ही नावे वगळण्यात येणार असून, सर्वच राजकीय पक्षांना हा धक्का असल्याचे मानले जात आहे. लोकसभा, विधानसभा व महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाल्याचा आरोप सर्वच राजकीय पक्षांनी केला होता. महापालिका निवडणुकीमध्ये यावरून दोन पक्षांमध्ये मारामारी होण्याचीही वेळ आली होती. वाशीतील एका प्रभागात मोठ्या प्रमाणात बोगस मतदार असल्याची तक्रार काँगे्रस पदाधिकारी विजय वाळुंज यांनी केली होती. हा वाद निवडणूक अधिकार्यांपर्यंत गेला होता. याच पद्धतीच्या तक्रारी इतर प्रभागांमध्येही झाल्या होत्या. वाशी सेक्टर १७ मधील एकाच घरात ३० मतदारांचा पत्ता असल्याचे निदर्शनास आले होते. नेरूळमध्ये एका राजकीय कार्यकर्त्याच्या विभागात त्यांच्या मूळ गावातील सर्व नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी झाली होती. विरोधी पक्षातील नागरिकांनी गावाकडील यादीमध्येही त्यांची नावे आहेत व या ठिकाणीही आहेत, हे निदर्शनास आणले होते. परंतु निवडणुकीच्या गोंधळामध्ये कोणतीही नावे वगळण्यात आली नाहीत. शहरात अनेक नगरसेवक बोगस मतदारांच्या बळावरच निवडून आल्याची चर्चा आहे. वाशीमध्ये उपमहापौर अविनाश लाड व इतर काही प्रभागामध्ये लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या जास्त होती. शहरातील लोकसंख्या साडेअकरा लाख व मतदार ८ लाख १५ हजार यावरूनच मोठ्या प्रमाणात बोगस मतदार असल्याचे स्पष्ट झाले होते. मतदानाच्या दिवशीही गोठीवलीमध्ये बोगस मतदारांना चोप दिल्यामुळे वातावरण तंग झाले होते. बोगस मतदार शोधून काढण्याच्या सूचना राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकार्यांनी दिल्या होत्या. दुबार नोंदी, मयत, स्थलांतरित मतदार वगळण्यात यावेत असे सूचित केले होते. केंद्रीय निवडणूक आयेागानेही या प्रस्तावास मान्यता दिली होती. यानंतर जिल्हाधिकार्यांनी नोव्हेंबर २०१४ मध्ये पत्र दिले होते. महापालिकेने नवी मुंबईमधील ऐरोली व बेलापूर मतदार संघातील मतदारांचे सर्वेक्षण केले. मतदार यादीतील नावाबरोबर आधारचा नंबर देण्यास सुरुवात केली. यामध्ये मोठ्याप्रमाणात बोगस नावे निदर्शनास आली. ऐरोली मतदार संघामध्ये तब्बल १ लाख १६ हजार १९७ व बेलापूर मतदार संघामध्ये १ लाख १६ हजार ३९४ नावे आढळून आली आहेत. हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत माहितीसाठी ठेवण्यात आला होता. ...मतदानादिवशीच यायचे मतदारशहरातील अनेक मतदार राजकीय पदाधिकार्यांचे नातेवाईक, गावाकडील नागरिक असतात. प्रभागांमध्ये शोधूनही निवडणूक विभागाच्या कर्मचार्यांना मतदार सापडले नाहीत. परंतु हेच मतदार मतदान करण्यासाठी मात्र मतदान केंद्रावर बरोबर पोहचतात. कारण मतदानासाठीच त्यांची नोंदणी करून घेण्यात आलेली असते. निवडणूक विभागाने कडक भूमिका घेतल्यामुळे भविष्यात बोगस मतदार कमी होणार आहेत.