शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कार घेऊन निघाला अन् वाटेत अर्धवट पूलावरून कारसह खाली कोसळला; ड्रायव्हरचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 10:12 IST

या ठिकाणी सुरू असलेल्या कामांबाबत कोणतीही मार्गदर्शक चिन्हे अथवा सूचना नव्हती आणि बॅरिकेड्सही हटवण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

नवी दिल्ली - पूर्व दिल्लीच्या कृष्णा नगरमध्ये राहणारे ४२ वर्षीय जगदीप सिंह त्यांची कार घेऊन घरातून बाहेर पडले. रस्त्यावरून जाताना बारापुला एलिवेटेड रोडवर काही अंतरावर गेले असताना अचानक त्यांचे पाय ब्रेककडे गेले. परंतु काही कळण्याच्या आतच कारसह ते ३० फुटावरून खाली कोसळले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले त्याठिकाणी फोनचा आवाज येत होता. जगदीप सिंह बेशुद्ध अवस्थेत पडले होते. पोलिसांना फोन उचलला तो जगदीप यांच्या पत्नीचा होता. घटनेबाबत त्यांनी फोनवरून माहिती दिली. 

ना फलक ना बॅरिकेडयानंतर जगदीपला रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जगदीप नोएडा येथील एका फर्ममध्ये काम करायचा. हा अपघात होईल याची कल्पनाही कुणी केली नव्हती. जगदीप सिंह  उड्डाणपुलावरून कार घेऊन जाताना समोर रस्ता असल्याचे जाणवले पण अचानक पूल मध्यभागी संपला. या पुलाचे बांधकाम सुरू होते. परंतु तिथे कोणत्याही प्रकारचे बांधकाम सुरू असल्याचा बोर्ड किंवा बॅरिकेडिंग, सूचना फलक नव्हता. रस्त्याचे हे बांधकाम बनविण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या कामांबाबत कोणतीही मार्गदर्शक चिन्हे अथवा सूचना नव्हती आणि बॅरिकेड्सही हटवण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

पीडब्ल्यूडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पूलाचा हा भाग बांधकामाधीन आहे, हे स्पष्ट दिसून येते. याशिवाय, रॅम्पवर १५ एक्स्टेंशन आहेत जे अद्याप लावलेले नाहीत. त्यामुळे लोखंडी सळ्या बाहेर चिकटल्या आहेत. रॅम्पवर गाडी चालवणे अवघड आहे. पीडित जगनदीप सिंग याने रॅम्पच्या अगदी शेवटपर्यंत गाडी चालवली असे पीडब्लूडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

प्रत्यक्षदर्शीने ऐकला आवाजयमुना खादर येथील रहिवासी असलेले ४९ वर्षीय देवेंद्र म्हणाले की, मी एका नर्सरीजवळ बसलो असताना मला मोठा आवाज आला. मला वाटले उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला आहे, पण नंतर एक कार खाली पडून पलटी झाल्याचे दिसले. देवेंद्र आणि इतर काही जण गाडी नीट करण्याचा प्रयत्न केला. ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या व्यक्तीने, ज्याने सीट बेल्ट लावला होता, त्याने कोणतीही हालचाल दाखवली नाही. डोक्यातून रक्त वाहत होतं. गाडी खाली असलेल्या झोपडपट्टीवर पडली असती तर जीवितहानी अधिक झाली असती, असे रहिवाशांनी सांगितले. 

टॅग्स :Accidentअपघात