मनपा कार्यालयांचे फायर ऑडीटच नाही अनास्था : अग्निशमन सुविधांअभावी रखडली प्रक्रिया; हालचाली सुरू

By Admin | Updated: April 19, 2016 23:22 IST2016-04-19T23:22:09+5:302016-04-19T23:22:09+5:30

जळगाव : मनपाच्या सतरा मजली इमारतीसह इतर कार्यालये व शाळा अशा एकूण ८२ इमारतींमध्ये अग्निशमन सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नसल्याने त्यांचे शासन नियमानुसार फायर ऑडीट होऊ शकलेले नाही. मनपाच्या सतरा मजली इमारतीत अग्निशमन यंत्रणा असली तरीही सभागृह व सर्व विभागांमध्ये फायर एस्टींग्युशर बसविलेले नाही. त्यामुळेे या इमारतीचेही फायर ऑडीट होऊ शकलेले नाही.

No audit of Fire audit of Municipal Offices: Procedure for redressal of fire services; Movements begin | मनपा कार्यालयांचे फायर ऑडीटच नाही अनास्था : अग्निशमन सुविधांअभावी रखडली प्रक्रिया; हालचाली सुरू

मनपा कार्यालयांचे फायर ऑडीटच नाही अनास्था : अग्निशमन सुविधांअभावी रखडली प्रक्रिया; हालचाली सुरू

गाव : मनपाच्या सतरा मजली इमारतीसह इतर कार्यालये व शाळा अशा एकूण ८२ इमारतींमध्ये अग्निशमन सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नसल्याने त्यांचे शासन नियमानुसार फायर ऑडीट होऊ शकलेले नाही. मनपाच्या सतरा मजली इमारतीत अग्निशमन यंत्रणा असली तरीही सभागृह व सर्व विभागांमध्ये फायर एस्टींग्युशर बसविलेले नाही. त्यामुळेे या इमारतीचेही फायर ऑडीट होऊ शकलेले नाही.
संचालक अग्निशमन सेवा, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी ३० सप्टेंबर २०१५ च्या आदेशान्वये राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय सार्वजनिक उपक्रमांच्या व अन्य सर्व इमारतींमध्ये अग्निशमन सुरक्षा यंत्रणा बसविण्याबाबत सूचित केले आहे. तसेच या इमारतींचे फायर ऑडीट करणेही बंधनकारक आहे. मात्र फायर ऑडीट करण्यापूर्वी या इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा नियमानुसार असणे आवश्यक आहे. मनपा कार्यालय, शाळांमध्ये ही यंत्रणा बसविलेली नसल्याने त्यांचे फायर ऑडीटही रखडले आहे.
महासभेने २०११ मध्येच दिलीय मंजुरी
या कार्यालयांमध्ये फायर एस्टींग्युशर बसविण्यास महासभेने १९ ऑक्टोबर २०११ च्या सभेतच खरेदीस मंजुरी दिली होती. मात्र अद्यापही त्याची पूर्ततता झालेली नाही. अखेरीस आता याबाबतचा प्रस्ताव तयार झाला आहे.
-----
२० लाखांचा प्रस्ताव
मनपाच्या सतरा मजली इमारतीसह ३८ मराठी व उर्दू शाळा, विद्युत विभागाचे ७ युनिट कार्यालय, प्रभाग समिती ३ कार्यालये (१ कार्यालय सतरा मजलीत आहे), बालगंधर्व खुले नाट्यगृह, मनपा जलतरण तलाव, सुवर्ण जयंती योजना कार्यालय, सानेगुरुजी वाचनालय, १० मनपा दवाखाने (३ मोठे, ७ लहान), सार्वजनिक बांधकाम व पाणीपुरवठा विभागाचे १९ युनिट कार्यालय अशा ८२ इमारतींमध्ये ३१५ नग फायर एस्टीग्युशर बसविण्यासाठी २० लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव आता अग्निशमन अधिकार्‍यांनी दिला आहे.

Web Title: No audit of Fire audit of Municipal Offices: Procedure for redressal of fire services; Movements begin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.