(निनाद) पुरंदर शिक्षक पतसंस्था निवडणुकीसाठी आज मतदान
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:13+5:302015-02-14T23:52:13+5:30
निकालही आजच जाहीर होणार : शिक्षक संघ आणि शिक्षक समितीला विजयाची आशा

(निनाद) पुरंदर शिक्षक पतसंस्था निवडणुकीसाठी आज मतदान
न कालही आजच जाहीर होणार : शिक्षक संघ आणि शिक्षक समितीला विजयाची आशा नारायणपूर : पुरंदर तालुक्यातील प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक उद्या (दि. १५ फेब्रुवारी) होत आहे. पुरंदर तालुका शिक्षक संघाचे सहकार पॅनल व शिक्षक समिती आणि पदवीधर संघटनेचे परिवर्तन पॅनल यांच्यात सरळ लढत होत आहे. तर, तीन अपक्ष नशीब अजमावत आहेत. १५ जागांमधून १० जागा सवसार्धारण गटासाठी, २ जागा महिलांसाठी, तर ३ जागा इतर मागास, अनुसूचित जाती, भटक्या विमुक्तांसाठी आरक्षित आहेत.सकाळी ९ वाजता मतदानाला सुरुवात होईल. दुपारी ४ वाजेपर्यंत ते चालणार आहे. तर, मतमोजणीला ५ वाजता सुरुवात होणार आहे. किमान ७ ते ८ वाजेपर्यंत निकाल लागणे अपेक्षित आहे. पतसंस्था ताब्यात ठेवण्यासाठी शिक्षक संघाची मोठी कसोटी लागणार आहे, कारण शिक्षक समितीनेही त्यांच्या समोर आता कडवे आव्हान ठेवले असल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत पुरंदर ५८८, हवेली ५८, दौंड ४०, बारामती १८, भोर ४०, वेल्हा १४, मुळशी २, मावळ १, नगरपालिका २५ असे मिळून ७३६ मतदार आहेत. या ८ तालुक्यांत शिक्षक मतदार आहेत. सर्वच उमेदवार प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचला आहे. आपल्यालाच मतदान कसे होईल, यासाठी सर्वच उमेदवार फिल्डिंग लावून आहेत. सध्या शिक्षक संघाच्या ताब्यात पतसंस्था आहे. संघाचे विद्यमान १० संचालक पुन्हा निवडणूक लढवीत आहेत, तर शिक्षक समितीचे ६ संचालक पुन्हा निवडणूक लढवीत आहेत. या निवडणुकीत अनेक शिक्षकनेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिक्षक संघ सहकार पॅनलप्रमुख राजेंद्र जगताप, गोरख मेमाणे, तानाजी झगडे, संजय जगताप, प्रदीप कुंजीर, जितेंद्र कुंजीर, दत्तात्रय गायकवाड हे शिक्षकनेते प्रचार सांभाळत आहेत. तर, परिवर्तन आघाडीकडून अप्पा भिसे, अरुण महाडिक, तानाजी फडतरे, संदीप जगताप, सुनील लोणकर, राजेंद्र कुंजीर हे शिक्षक नेते प्रचार सांभाळत आहेत. ०००