(निनाद) राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेनेत होणार थेट लढत

By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:13+5:302015-08-27T23:45:13+5:30

मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : दोन्ही पक्षांच्या पॅनलचे उमेदवार जाहीर

(NNAD) NCP-Shiv Sena will fight directly | (निनाद) राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेनेत होणार थेट लढत

(निनाद) राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेनेत होणार थेट लढत

चर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : दोन्ही पक्षांच्या पॅनलचे उमेदवार जाहीर
मंचर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँगे्रस व शिवसेना यांनी त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. राष्ट्रवादी पुरस्कृत भीमाशंकर शेतकरी विकास पॅनल व शिवसेना पुरस्कृत भीमाशंकर शेतकरी परिवर्तन पॅनल यांच्यात सरळसरळ लढत होत आहे.
राष्ट्रवादी पुरस्कृत भीमाशंकर शेतकरी विकास पॅनलचे उमेवार पुढीलप्रमाणे : सोसायटी गट सर्वसाधारण - देवदत्त निकम, सखाराम काळे, दत्तात्रय तोत्रे, दत्तात्रय वावरे, दत्तात्रय हगवणे, गणपतराव इंदोरे, बाळासाहेब बाणखेले. इतर मागास प्रवर्ग : अशोक डोके, महिला प्रतिनिधी : मयूरी शिंगाडे, जायदाबी मुजावर, अनुसूचित जमाती : देहू कोकाटे, ग्रामपंचायत मतदारसंघ सर्वसाधारण : शिवाजी निघोट, बाळासाहेब मंेगडे. अनुसूचित जाती जमाती : संजय शेळके, आर्थिक दुर्बल : ज्ञानेश्वर घोडेकर. आडते व तोलारी मतदार संघ : बाळासाहेब बाणखेले, सागर थोरात, राष्ट्रवादीचे विलास तुळशीराम गांजाळे व प्रमोद दिनकर वळसे पाटील बिनविरोध निवडले गेले आहेत.
शिवसेना पुरस्कृत भीमाशंकर शेतकरी परिवर्तन पॅनलचे उमेदवार पुढीलप्रमाणे : कृषी पतसंस्था सर्वसाधारण - राजाराम बाणखेले, विनायक धुमाळ, बाळासाहेब आवटे, वासुदेव भालेराव, बबन उंडे, सखाराम केंगले, लक्ष्मण काळे. महिला प्रतिनिधी : सीताबाई धरम, सरुबाई चौर. इतर मागास प्रवर्ग : राधु बनकर. अनुसूचित जमाती : विलास घोडे. ग्रामपंचायत मतदारसंघ : गणपत भापकर, विजय पवार. अनुसूचित जातीजमाती : जितेंद्र माळुंजे. आर्थिक दुर्बल : संदीप घोडेकर. व्यापारी व आडते मतदारसंघ : संतोष पडवळ, विकास बांगर
उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष विष्णूकाका हिंगे, देवदत्त निकम, बाजार समितीचे सभापती प्रकाश घोलप, शरद बँकेचे उपाध्यक्ष शिवाजीराव लोंढे, संचालक विवेक वळसे पाटील, महादू भोर तसेच शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रवींद्र करंजखिले, तालुकाप्रमुख सुनील बाणखेले, राजाराम बाणखेले, अरुण गिरे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजू इनामदार आदी उपस्थित होते.

Web Title: (NNAD) NCP-Shiv Sena will fight directly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.