शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

आरोग्य मंत्रालयाने NMC च्या आदेशाला दिली स्थगिती; लवकरच नव्या नियमांमध्ये होणार सुधारणा! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 16:45 IST

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 

नवी दिल्ली : नॅशनल मेडिकल कमिशनकडून (NMC) नुकतेच काही नवीन नियम लागू करण्यात आले होते. हे नियम अधिसूचित केल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) आणि आयपीएने  (IPA) याला विरोध दर्शविला होता. यानंतर आता केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 

इंडियन मेडिकल असोसिएशन आणि आयपीएच्या विरोधामुळे डॉ. मनसुख मांडविया यांनी डॉक्टरांसाठी जारी केलेले हे नियम पुढील अधिसूचना जारी होईपर्यंत स्थगित केले आहेत. तसेच या प्रकरणाची नॅशनल मेडिकल कमिशनकडून दखल घेतली जाईल, असे आश्वासन डॉ. मनसुख मांडविया यांनी दिले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. मनसुख मांडविया यांनी यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. 

या बैठकीत इंडियन मेडिकल असोसिएशनने या अधिसूचनेला कडाडून विरोध केला. आयएमए आणि आयपीएने विरोध करत नॅशनल मेडिकल कमिशनच्या या नियमांना चुकीचे म्हटले. या विरोधानंतर नॅशनल मेडिकल कमिशनच्या नव्या नियमावलीवर पुढील आदेशापर्यंत बंदी घालण्यात आली आहे.दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नॅशनल मेडिकल कमिशनने डॉक्टरांसाठी नवे नियम जारी केले होते,

नॅशनल मेडिकल कमिशनने डॉक्टरांसाठी जारी केलेल्या नियमांमध्ये रुग्णांना फक्त जेनेरिक औषधे लिहून दिली जातील, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. याचबरोबर, कॉन्फरन्सला न जाणे आदी बंधनांनी भरलेल्या आचारसंहितेवरही बंदी घालण्यात आली होती. मात्र, आता आरोग्य मंत्रालयाने पुढील निर्णय किंवा अधिसूचना जारी होईपर्यंत या आदेशांना स्थगिती दिली आहे.

जेनेरिक औषधे लिहून द्या, नाही तर जबर दंड; कमिशनकडून आधीचे डॉक्टरांसाठी नियम

टॅग्स :Healthआरोग्य