(िनिनाद) लोकअदालतीमधून झाली ५३ लाखांची वसुली
By Admin | Updated: April 13, 2015 23:53 IST2015-04-13T23:53:11+5:302015-04-13T23:53:11+5:30
घोडेगाव : आंबेगाव तालुक्यात असलेल्या १०३ ग्रामपंचायतींमधील थकीत मिळकत करासंदर्भातील ३,००० दावे घोडेगाव न्यायालयात आयोजित लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आले होते. यांतील २,५१६ दावे निकाली निघून तब्बल ५३ लाख ३ हजार ७३१ रुपयांची वसुली करण्यात आली.

(िनिनाद) लोकअदालतीमधून झाली ५३ लाखांची वसुली
घ डेगाव : आंबेगाव तालुक्यात असलेल्या १०३ ग्रामपंचायतींमधील थकीत मिळकत करासंदर्भातील ३,००० दावे घोडेगाव न्यायालयात आयोजित लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आले होते. यांतील २,५१६ दावे निकाली निघून तब्बल ५३ लाख ३ हजार ७३१ रुपयांची वसुली करण्यात आली. घोडेगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात तालुका विधी सेवा समितीने दि. ११ रोजी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन घोडेगाव न्यायालयाचे न्यायाधीश पी. सी. रामदीन यांच्या हस्ते झाले. या वेळी गटविकास अधिकारी विवेक इलमे, प्रभारी तहसीलदार विजय केंगले, घोडेगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. एस. जी. टाके आदी मान्यवर वकील व पक्षकार उपस्थित होते. न्यायाधीश पी. सी. रामदीन म्हणाले, 'लोकअदालतीमुळे दिवाणी, फौजदारी खटल्यांबरोबरच ग्रामपंचायत, बँक, विद्युत वितरण कंपनी यांची थक बाकी प्रकरणे तडजोडीने सोडविली जातात. लोकांनीही बँकेची थकीत प्रकरणे, ग्रामपंचायत थकबाकीची प्रकरणे सामंजस्याने मिटवली, तर सगळ्यांना त्याचा फायदा होतो. लोकअदालतीमध्ये होणारा तडजोडनामा दोन्ही पक्षकारांवर बंधनकारक असतो. सामोपचाराने प्रकरणे मिटवून घेणे सगळ्यांच्या दृष्टीने हिताचे आहे.या लोकअदालतीमध्ये ग्रामपंचायतींचे दाखलपूर्व ३,००० खटले दाखल करण्यात आले होते. यांतील जवळपास २ हजार ५१६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून जवळपास ५३ लाख ३ हजार ७३१ रुपये वसूल झाले. तसेच, दिवाणी व फौजदारी स्वरूपाची २४० प्रकरणे ठेवली होती. त्यापैकी २७ प्रकरणे निकाली निघाले. यातून ९ लाख ८० हजार ३९४ रुपयांची वसुली झाली. 13042015-ॅँङ्मि-05 - घोडेगाव येथे झालेल्या लोकअदालतीच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना घोडेगाव न्यायालयाचे न्यायाधीश पी. सी. रामदीन,13042015-ॅँङ्मि-06 - घोडेगाव येथे झालेल्या लोकअदालतीमध्ये दावे पाहाताना घोडेगाव न्यायालयाचे न्यायाधीश पी. सी. रामदीन, प्रभारी तहसीलदार विजय केंगले.छाया - नीलेश काण्णव०००