बिहारमध्ये पुन्हा नितीशराज ?
By Admin | Updated: November 8, 2015 11:42 IST2015-11-08T11:40:35+5:302015-11-08T11:42:13+5:30
बिहार विधानसभा निवडणुकीत जदयू पक्षाला राजदपेक्षा कमी जागांवर आघाडी मिळाली असली तरी बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर नितीशकुमार यांचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे.

बिहारमध्ये पुन्हा नितीशराज ?
ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. ८ - बिहार विधानसभा निवडणुकीत जदयू पक्षाला राजदपेक्षा कमी जागांवर आघाडी मिळाली असली तरी बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर नितीशकुमार यांचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे. जदयूचे अध्यक्ष शरद यादव यांनी तसे संकेत दिले असून जदयूच्या या भूमिकेला राजद पाठिंबा देईल का याकड़े सर्वांचे लक्ष लागले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत दहाव्या फेरीनंतर लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने ७४, जदयूने ६९, काँग्रेसने १५ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपा ६३, राष्ट्रीय लोकसमाज पक्ष ४, लोकजनशक्ती पक्षाने ५, हिंदूस्तान आवाम मोर्चाने ३ जागांवर आघाडी घेतली आहे. कम्यूनिस्ट पक्षाने २ तर अन्य पक्षांनी ६ जागांवर आघाडी घेतली आहे. जदयूप्रणित महाआघाडीत राजदने सर्वाधिक जागांवर आघाडी घेतली आहे. राजदला आघाडी मिळाली असली तरी मुख्यमंत्रीपदावर जदयूचे नितीशकुमार यांचीच वर्णी लागेल असे विधान जदयूचे अध्यक्ष शरद यादव यांनी सांगितले आहे.