नितीश कुमारांची राजद आमदारांसोबत चर्चा
By Admin | Updated: April 10, 2015 23:29 IST2015-04-10T23:29:59+5:302015-04-10T23:29:59+5:30
पाटणा : जनता परिवारातील पक्षांच्या विलिनीकरणाच्या दिशेने सक्रिय झालेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शुक्रवारी या मुद्यावर राष्ट्रीय जनता दलाच्या(राजद)आमदारांसोबत चर्चा केली.

नितीश कुमारांची राजद आमदारांसोबत चर्चा
प टणा : जनता परिवारातील पक्षांच्या विलिनीकरणाच्या दिशेने सक्रिय झालेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शुक्रवारी या मुद्यावर राष्ट्रीय जनता दलाच्या(राजद)आमदारांसोबत चर्चा केली.नितीश कुमार व राजद आमदारांची बैठक सुमारे तासभर चालली. या बैठकीत नितीश यांनी प्रत्येक आमदाराकडून त्यांच्या मतदारसंघातील समस्यांबाबत जाणून घेतले. निवडणुका जवळ आहेत. लवकरच आपण सर्व एक होणार आहोत. आपल्याला सर्वांना एकत्र येऊन काम करावे लागेल. जनता परिवारातील पक्ष एक ध्वज आणि एका निवडणूक चिन्हावर निवडणूक लढतील, असे नितीश यावेळी म्हणाले.