नितीश कुमारांची आमदारकी रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:36 IST2017-08-02T00:36:20+5:302017-08-02T00:36:30+5:30
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे विधान परिषद सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी करणा-या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी तयारी दाखवली.

नितीश कुमारांची आमदारकी रद्द करा
नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे विधान परिषद सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी करणाºया याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी तयारी दाखवली. नितीश कुमार यांनी त्यांच्याविरोधात प्रलंबित असलेल्या गुन्हेगारी खटल्याची माहिती दडवून ठेवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
न्या. दीपक मिसरा, अमिताव रॉय आणि ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठाने म्हटले की, याचिकेवर सुनावणी घेतली जाईल. वकील एम. एल. शर्मा यांनी सोमवारी दाखल केलेल्या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली होती.
नितीश कुमार यांच्याविरोधात गुन्हेगारी खटला सुरू आहे, असा आरोप या याचिकेत करण्यात आलेला आहे. १९९१मध्ये लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे स्थानिक नेते सीताराम सिंह यांची हत्या आणि इतर चार जण जखमी झाल्याच्या घटनेत नितीश कुमार आरोपी आहेत.