- हरीश गुप्ता लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : बिहारमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांमध्ये उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते सम्राट चौधरी यांचे नाव पुढे असल्याचे समजते.
मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये चौधरी उपमुख्यमंत्री असून गृहखातेही त्यांच्याकडे आहे. प्रशासनातील जबाबदारी ते प्रभावीपणे सांभाळत आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी त्यांचे चांगले संबंध हीदेखील त्यांची मोठी जमेची बाजू मानली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा त्यांच्यावर विश्वास असल्याचे सांगितले जाते. त्याचबरोबर जदयूशीही त्यांचा समन्वय चांगला आहे.
तथापि, या शर्यतीत अन्य नावेही चर्चेत आहेत. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल, मागासवर्गीय समुदायातील चेहरा जनक राम, उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांची नावे आहेत. मात्र बिहारमधील राजकीय गुंतागुंत पाहता भाजपसाठी व्यवहार्य पर्याय म्हणून सम्राट चौधरी यांचे नाव पुढे येत आहे.
अमित शाह यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा संदर्भ ऑक्टोबर २०२५ मधील विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान अमित शाह यांनी चौधरी यांच्या मतदारसंघातील सभेत केलेले विधान विशेष चर्चेत आले होते. शाह म्हणाले होते की, ते आधीच उपमुख्यमंत्री आहेत.पुढील काळात पंतप्रधान मोदी त्यांना मोठा नेता बनवतील. या वक्तव्याला चौधरींसाठी मोठ्या भूमिकेचे संकेत मानले गेले. बिहारमधील जातीय समीकरणेही चौधरी यांच्या बाजूने असल्याचे मानले जाते.
Web Summary : Nitish Kumar may go to Delhi for six years. Samrat Choudhary, current Deputy CM, is a leading candidate for Bihar Chief Minister due to his strong administrative skills, BJP ties, and support from Amit Shah and PM Modi.
Web Summary : नीतीश कुमार छह साल के लिए दिल्ली जा सकते हैं। उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी अपनी मजबूत प्रशासनिक क्षमताओं, भाजपा संबंधों और अमित शाह और पीएम मोदी के समर्थन के कारण बिहार के मुख्यमंत्री पद के लिए एक प्रमुख उम्मीदवार हैं।