नितीश कुमार यांच्यावर चप्पल फेकली

By Admin | Updated: January 28, 2016 21:42 IST2016-01-28T19:58:17+5:302016-01-28T21:42:17+5:30

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना आज एका कार्यक्रमात चप्पल फेकून मारण्यात आली. व्यासपीठापर्यंत चप्पल न पोहचल्यानं नितीश कुमार त्यामधून बचावले.

Nitish Kumar threw a sandal | नितीश कुमार यांच्यावर चप्पल फेकली

नितीश कुमार यांच्यावर चप्पल फेकली

ऑनलाइन लोकमत

पाटणा, दि. २८ - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना आज  एका कार्यक्रमात चप्पल फेकून मारण्यात आली. व्यासपीठापर्यंत चप्पल न पोहचल्यानं नितीश कुमार त्यापासून बचावले. चप्पल फेकणा-या त्या व्यक्तीला पोलीसांनी तात्काळ अटक केली आहे.

स्वातंत्र्य सैनिकांशी संबंधीत असलेल्या ख्तियारपूर येथील कार्यक्रमात हा प्रकार घडला. कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेली सुरक्षा व्यवस्था तोडून त्या व्यक्तिनं मुख्यमंत्र्यांच्या दिशेनं चप्पल भिरकावली होती. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्या व्यक्तीला अडवलं आणि  पोलीसांच्या स्वाधिन केले.. पोलिसांकडून त्याची चौकशी करण्यात येत आहे.

यापुर्वी, बिहार विधान परिषदेच्या निवडणुक प्रचारातही एका व्यक्तीनं नितीश कुमार यांच्य़ावर चप्प्ल फेकली होती, तो व्यक्ती पळ काढण्यात यशस्वी झाला होता, असं सांगण्यात येत आहे.

 

Web Title: Nitish Kumar threw a sandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.