शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

नितीश कुमार पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले, पंतप्रधान मोदी तत्काळ खुर्चीवरून उठले अन्...; सभेचा VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 16:26 IST

...यानंतर मोदी आणि नितीश यांनी हस्तांदोलन करून एकमेकांचे स्वागत केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी दरभंगा येथे आयोजित एका सरकारी कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी येथील शोभन येथे बिहारच्या दुसऱ्या एम्सची पायाभरणीही केली. या समारंभादरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पायाला स्पर्श करण्यासाठी खाली वाकले. नितीश पायाला स्पर्श करण्यासाठी खाली वाकताना पाहून पंतप्रधान तात्काळ त्यांच्या खुर्चीवरून उभे राहिले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना तसे करण्यापासून रोखले. यानंतर मोदी आणि नितीश यांनी हस्तांदोलन करून एकमेकांचे स्वागत केले. 

यानंतर सीएम नितीश पंतप्रधानांच्या शेजारी असलेल्या खुर्चीवर जाऊन बसले. याचा व्हडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरेतर, नितीश यांनी यापूर्वीही दोन वेळा मोदींच्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी रस्ते आणि रेल्वेशी संबंधित प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही केले. 

मुख्यमंत्री नितीश कुमार व्यासपीठावर पोहोचताच पीएम मोदींसमोर पोहोचले आणि त्यांच्या पायाला स्पर्श करण्यासाठी खाली वाकले. मात्र, पंतप्रधान मोदी तत्काळ त्यांच्या खुर्चीवरून उठले आणि त्यांनी त्यांना तसे करण्यापासून रोखले आणि स्वत: उठून नितीश कुणार यांना अभिवादन केले.

पंतप्रधान मोदी आणि नितीश यांचे एकमेकांवर स्तुती सुमने - दरभंगा येथील सभेत पीएम नरेंद्र मोदी आणि सीएम नितीश कुमार यांनी एकमेकांचे भरभरून कौतुक केले. दरभंगा येथे एम्सच्या पायाभरणीबद्दल नितीश यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. त्यांनी बैठकीत उपस्थित लोकांना उभे राहून पंतप्रधानांना अभिवादन करण्यास सांगितले. दरम्यान, पंतप्रधानांनीही आपल्या भाषणात नितीश यांच्या सुशासन आणि धोरणांचे कौतुक केले. केंद्रात मोदी आणि बिहारमध्ये नितीश यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार चांगले काम करत असल्याचेही ते म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNitish Kumarनितीश कुमारBiharबिहार