शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

नितीशकुमारांनी भाजपासमोर खाते वाटपाचा फॉर्म्युला ठेवला? टीडीपीची मागणी मोदी मान्य करणार का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 11:12 IST

आधीच्या दोन टर्ममध्ये भाजपाच बहुमतात असल्याने ते देतील ती मंत्रिपदे घेतल्याशिवाय मित्रपक्षांना गत्यंतर नव्हते. आता दिवस बदलले आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहेत. एनडीएची तयारी सुरु झाली आहे. अशातच किंगमेकर ठरलेल्या नितीशकुमार यांनी व इतर घटक पक्षांनी भाजपाला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. आधीच्या दोन टर्ममध्ये भाजपाच बहुमतात असल्याने ते देतील ती मंत्रिपदे घेतल्याशिवाय मित्रपक्षांना गत्यंतर नव्हते. आता दिवस बदलले आहेत. आता मित्रपक्ष म्हणतील ते मंत्रिपद सत्तेत राहण्यासाठी द्यावे लागणार आहे. 

लोकसभा निवडणुकीत २९३ जागा जिंकणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) नेतेपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली. दिल्लीत बुधवारी झालेल्या या बैठकीत तेलुगू देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू व संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांच्यासह सर्व घटकपक्षांच्या नेत्यांनी एनडीएला समर्थन देत असल्याचे पत्र सादर केले. त्यामुळे निकालानंतर चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांच्या राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. 

आता सत्तेत मोठा वाटा मिळेपर्यंत नितीशकुमार दिल्लीतर तळ ठोकून असणार आहेत. सुत्रांनुसार नितीशकुमार यांनी मंत्रिपदांच्या वाटणीसाठी एक फॉर्म्युला भाजपसमोर ठेवला आहे. यानुसार चार खासदारांमागे एक कॅबिनेट मंत्रिपद दिले जावे. यानुसार जेडीयूचे १२ खासदार आहेत मग नितीशकुमारांना तीन कॅबिनेट मंत्रिपदे हवी आहेत. 

दुसरीकडे चंद्राबाबू नायडूंची टीडीपीने देखील खलबते सुरु केली आहेत. त्यांचे १६ खासदार आहेत. यामुळे टीडीपी लोकसभा अध्यक्षपद, रस्ते वाहतूक, ग्रामीण विकास,  आरोग्य, कृषी, शिक्षण आणि अर्थखाते मागण्याची शक्यता आहे. भाजपाला बहुमताचा आकडा पार करता न आल्याने आता या दोघांच्या मागण्यांवर तोडपाणी करावे लागणार आहे. 

शुक्रवारी राष्ट्रपतींकडे दावा; शनिवारी शपथविधी?एनडीएच्या सर्व खासदारांची शुक्रवार, ७ जून रोजी दुपारी २ वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात येईल. तत्पूर्वी सकाळी ११ वाजता भाजप संसदीय पक्षाची बैठक होऊन त्यामध्ये नरेंद्र मोदी यांची भाजपच्या नेतेपदी निवड केली जाईल. या बैठकीनंतर एनडीएचे सर्व प्रमुख नेते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ स्थापनेचा दावा करणार आहेत. त्यानंतर शनिवारी, ८ जून रोजी नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी वर्तविली आहे. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४