शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

"नितीश कुमार यांनी विश्वासार्हता गमावली, राजीनामा दिला तर...", ममता बॅनर्जींचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 08:07 IST

७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजभवनात एका कार्यक्रमादरम्यान ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कोलकाता : बिहारच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार (Nitish Kumar) हे विरोधकांच्या इंडिया आघाडीतून बाहेर पडणार आणि राज्यात पुन्हा भाजपामध्ये सामील होणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी मोठे विधान केले आहे. त्या म्हणाल्या की, नितीशकुमार इंडिया आघाडीमधून बाहेर पडल्यानंतर आघाडीवर फारसा परिणाम होणार नाही.

७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजभवनात एका कार्यक्रमादरम्यान ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, "मला वाटते की नितीश कुमार यांनी बिहारच्या लोकांच्या नजरेत आपली विश्वासार्हता गमावली आहे. त्यांनी राजीनामा दिल्यास तेजस्वी यादव यांना बिहारमध्ये सुरळीतपणे काम करणे सोपे होईल." अलीकडेच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला पक्ष तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवेल, असे जाहीर केले होते. तसेच, प्रादेशिक पक्ष एकत्र राहतील आणि लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतरच भविष्यातील सर्व निर्णय घेतले जातील, असे त्या म्हणाल्या होत्या. 

दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी केंद्र सरकारला विविध केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत पश्चिम बंगाल सरकारला केंद्रीय निधी न दिल्याबद्दल चेतावणी देणारी नोट जारी केली. सीएम ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'जोपर्यंत केंद्राचा निधी येत्या सात दिवसांत दिला जात नाही, तोपर्यंत या मुद्द्यावर आणखी आंदोलने केली जातील.' मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारद्वारे विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे राज्य सरकारने समाधानकारक दिल्यानंतर सुद्धा केंद्राचा निधी जारी झालेला नाही. 

इंडिया आघाडीसाठी बजावली महत्त्वाची भूमिकानितीश कुमार सध्या इंडिया आघाडीत आहेत. या आघाडीत विरोधी बाकावरील एकूण २८ घटक पक्ष आहेत. या विरोधकांना एकत्र आणण्यासाठी नितीश कुमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा, शिवसेना (ठाकरे गट) अशा देशातील वेगवेगळ्या नेत्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे नितीश कुमार यांनी आता भाजपाशी हातमिळवणी केल्यास इंडिया आघाडीच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. नितीश कुमार यांच्या या निर्णयाचा बिहारमधील महाआघाडी, तसेच राष्ट्रीय पातळीवरील इंडिया आघाडीला मोठा फटका बसू शकतो. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारMamata Banerjeeममता बॅनर्जीBiharबिहार