शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
3
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
4
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
5
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
6
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
7
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
8
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
9
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
10
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
11
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
12
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
13
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
14
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
15
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
16
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
17
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
18
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
19
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
20
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
Daily Top 2Weekly Top 5

नितीश कुमार यांनी ज्येष्ठ नेत्याला दिला पक्षातून नारळ, जेडीयू म्हणाली, आता आमचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 15:04 IST

K. C. Tyagi News: केंद्रातील एनडीएस सरकारमधील मुख्य भागीदार आणि बिहारमधील सत्ताधारी असलेल्या जनता दल युनायटेड पक्षाने एक मोठा निर्णय घेताना पक्षाचे ज्येष्ठ नेते के. सी. त्यागी यांना पक्षातून नारळ दिला आहे.

केंद्रातील एनडीएस सरकारमधील मुख्य भागीदार आणि बिहारमधील सत्ताधारी असलेल्या जनता दल युनायटेड पक्षाने एक मोठा निर्णय घेताना पक्षाचे ज्येष्ठ नेते के. सी. त्यागी यांना पक्षातून नारळ दिला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये के. सी. त्यागी यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे पक्षात असंतोष निर्माण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. दरम्यान, के. सी. त्यागी यांचा जनता दल युनायटेड पक्षातील अध्याय आता संपुष्टात आला असल्याचे पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. हल्लीच बांगलादेशी क्रिकेटपटूंबाबत केलेल्या वक्तव्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार के.सी. त्यागी यांनी गेल्या काही काळापासून पक्षाच्या अधिकृत भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका पांडण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर जेडीयूने त्यांच्यापासून अंतर बाळगण्याचा निर्णय घेतला होता. पक्षाचे प्रवक्ते राजीव रंजन यांच्या हल्लीच्या वक्तव्यांमुळे जेडीयूचा आता के. सी. त्यागी यांच्यासोबत कुठलाही औपचारिक संबंध राहिलेला नाही, हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे.

के. सी. त्यागी यांनी हल्लीच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भारतरत्न सन्मान देण्याची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहिलं होतं.  गतवर्षी चौधरी चरण सिंह आणि कर्पुरी ठाकूर यांना ज्याप्रमाणे भारतरत्न सन्मानाने सन्मानित करण्यात आलं, त्याचप्रमाणे नितीश कुमार हे सुद्धा या सन्मानासाठी पूर्ण हक्कदार आहेत, असा दावा त्यांनी केला होता. मात्र जेडीयूने या मागणीपासून स्वत:ला दूर ठेवले होते.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार के. सी. त्यागी आणि जेडीयू यांनी सन्मानपूर्वक आपले मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यागी यांचे पक्षासोबत असलेले दीर्घकालीन संबंध पाहता पक्षनेतृत्वाने त्यांच्याविरोधात कुठलीही औपचारिक अनुशासनात्मक कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे. के. सी. त्यागी यांनी पक्षामध्ये अनेक महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्या आहेत. त्यामुळे पक्षनेतृत्व त्यांच्यासोबत कुठलेही मतभेद निर्माण करू इच्छित नाही. मात्र के. सी. त्यागी आता जेडीयूचं धोरण, निर्णय आणि अधिकृत भूमिकांबाबत प्रतिनिधित्व करणार नाही, असेही पक्षातील सूत्रांनी सांगितले आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Nitish Kumar Ousts Senior Leader; JDU Severs All Ties

Web Summary : JDU expelled senior leader K.C. Tyagi due to controversial statements and differing views. The party distanced itself, citing Tyagi's unauthorized advocacy, including recommending Nitish Kumar for Bharat Ratna. JDU avoids disciplinary action, respecting Tyagi's past contributions, but ends his representation of party policy.
टॅग्स :Janta Dal Unitedजनता दल युनायटेडBiharबिहार