शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

नितीशकुमारच मुख्यमंत्रिपदी; उपमुख्यमंत्रिपदाबाबत उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2020 06:27 IST

Bihar Election: बिहारमध्ये रालोआच्या बैठकीत शिक्कामोर्तब; उपमुख्यमंत्रिपदाबाबत उत्सुकता

 लोकमत न्यूज नेटवर्कपाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हेच असतील, यावर रविवारी झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. सोमवारी नितीशकुमार चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. मात्र, उपमुख्यमंत्रिपद कोणाकडे सोपविले जाईल, याबाबत उत्सुकता असून तारकिशोर प्रसाद आणि रेणुदेवी यांची नावे या पदासाठी आघाडीवर आहेत. भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी तारकिशोरप्रसाद सिंह यांची निवड करण्यात आली आहे.नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला १२५ जागांवर विजय मिळाला. रालोआला निसटते बहुमत मिळाले असले तरी नितीशकुमार यांच्या जदयुला अवघ्या ४३ जागांवर समाधान मानावे लागले.

पद स्वीकारण्यासाठी नव्हते तयार तत्पूर्वी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्रिपद स्वीकारण्याची नितीश यांची तयारी नव्हती. भाजपमधून कोणीतरी ही जबाबदारी स्वीकारावी, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, भाजपने त्यांनाच ही जबाबदारी स्वीकारण्याची गळ घातली.

सुशीलकुमार यांच्या ट्विटमुळे खळबळबिहारचे मावळते उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी नाराज असल्याचे समजते. मोदी यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड जाहीर होईल, असे अपेक्षित होते. मात्र, बैठकीत याबाबत निर्णय झाला नाही. n सुशीलकुमार मोदी यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. ‘४० वर्षांच्या राजकीय प्रवासात संघ परिवार आणि भाजपने मला खूप काही दिले आहे. n अन्य कोणीही मला तेवढे देऊ शकले नसते. यापुढेही पक्षाकडून मिळणाऱ्या जबाबदारीचे मी स्वागतच करेन. माझे कार्यकर्तापद कोणीही हिरावून घेऊ शकत नाही’, असे ट्विट मोदी यांनी केल्याने बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. 

आज शपथविधी nया सर्व पार्श्वभूमीवर रविवारी नितीशकुमार यांच्या शासकीय निवासस्थानी रालोआच्या घटक पक्षांची बैठक झाली. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत नितीशकुमार यांची एकमुखाने नेतेपदी निवड करण्यात आली. nत्यामुळे बिहारचे पुढील मुख्यमंत्री नितीशकुमार हेच असतील, यावर शिक्कामोर्तब झाले. नेतेपदी निवड झाल्यानंतर नितीशकुमार यांनी राज्यपाल फगु चौहान यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. nराज्यपालांनी सांगितल्याप्रमाणे सोमवारी सायंकाळी शपथविधी सोहळा पार पडेल, असे नितीशकुमार यांनी राज्यपाल भेटीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितले.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपा