शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्रिपदी नितीशकुमारच; बिहार भाजपमध्ये दुमत नाही, मात्र दोन उपमुख्यमंत्रिपदांचा आग्रह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2020 07:04 IST

त्यादृष्टीने वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. बिहारमध्ये भाजपने ७४ तर जेडी

- हरिश गुप्तानवी दिल्ली : बिहारच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकतांत्रिक आघाडीमध्ये (एनडीए) भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या. आता आधी दिलेल्या शब्दानुसार विद्यमान मुख्यमंत्री व संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते नितीशकुमार यांच्याकडेच राज्य सरकारचे नेतृत्व राहील, याबाबत भाजपमध्ये कोणतेही दुमत नाही. मात्र, त्या मोबदल्यात भाजपला २ उपमुख्यमंत्रिपदांसह महत्वाची खाती हवी आहेत.

तसेच नव्या मित्रपक्षांनाही मंत्रिमंडळात सामावून घ्यायचे आहे. त्यादृष्टीने वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. बिहारमध्ये भाजपने ७४ तर जेडीयूने ४३ जागा जिंकल्या. राज्यात मित्रपक्षापेक्षा जास्त जागा जिंकण्याची ही भाजपची पहिलीच वेळ. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत पक्षाने ३१ जागा जास्त जिंकल्या. मतांमध्येही चार टक्क्यांनी वाढ झाली. 

भाजपला हवी महत्त्वाची खाती  

भाजप आणि जेडीयूला आता सत्तेतील वाट्याचा प्रश्न सोडवायचा आहे. विद्यमान उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना कायम ठेवायचे झाल्यास भाजपकडून दोन उपमुख्यमंत्रिपदांची मागणी होऊ शकते. तसेच भाजपला महत्त्वाची खाती हवी आहेत. 

विकासशील इन्साफ पार्टी (व्हीआयपी)लाही मंत्रिमंडळात सामावून घ्यायचे आहे. तसेच काँग्रेसच्या १९ आमदारांनाही फोडण्याची भाजपची योजना आहे.

एनडीएमध्ये ‘चिराग’ नको : नितीशकुमार

निवडणुकीत सातत्याने त्यांच्याविरोधात भूमिका घेणाऱ्या लोकजनशक्ती पार्टीला एनडीएमध्ये स्थान देऊ नये, यासाठी नितीशकुमार यांनी भाजपच्या पक्षनेतृत्वाकडे आग्रह धरला आहे. 

चिराग यांच्या भूमिकेमुळे नितीशकुमारांना किमान २० जागांवर पराभव पत्कारावा लागला. विशेष म्हणजे, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर नितीशकुमारांना जायचे नाही. 

हे सर्व मुद्दे सुटल्याशिवाय जेडीयू केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही.

राय यांच्याकडे  राज्याची धुरा?

प्रचाराची धुरा सांभाळून मोठा हातभार लावणारे केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांना उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देऊन राज्यात परत पाठविण्याची भाजपची योजना आहे. त्यांनाच पुढे मुख्यमंत्रिपदी बसविण्याची चर्चा सुरु आहे. राय यांनी यावेळी २०० पेक्षा जास्त सभा घेतल्या. पक्षाचा ‘यादव’ चेहरा म्हणून ते समोर आले.

सीएम बदलण्याचा प्रश्नच नाही

भाजपने जदयूपेक्षा जास्त जागा जिंकल्या. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी दिलेला शब्द भाजप पाळणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, नितीशकुमार यांना बदलण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे सुशील मोदी यांनी स्पष्ट केले. बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांनीही हीच भूमिका घेतली. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक