नितीश कुमार मुख्यमंत्री झाले म्हणून त्याने आनंदात स्वत:चे बोट कापले

By Admin | Updated: November 23, 2015 17:19 IST2015-11-23T17:11:47+5:302015-11-23T17:19:19+5:30

नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री झाल्याच्या आनंदात एका व्यक्तीने आपल्या हाताचे बोट कापून घेतले. अनिल शर्मा असे या व्यक्तीचे नाव असून तो नितीश कुमार यांचा मोठा

As Nitish Kumar became the chief minister, he cut his finger in joy | नितीश कुमार मुख्यमंत्री झाले म्हणून त्याने आनंदात स्वत:चे बोट कापले

नितीश कुमार मुख्यमंत्री झाले म्हणून त्याने आनंदात स्वत:चे बोट कापले

>ऑनलाइन लोकमत
पटणा, दि. २३ -  नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री झाल्याच्या आनंदात एका व्यक्तीने आपल्या हाताचे बोट कापून घेतले.
अनिल शर्मा असे या व्यक्तीचे नाव असून तो नितीश कुमार यांचा मोठा चाहता असल्याचे सांगतो. नितीश कुमार मुख्यमंत्री बनले म्हणून चक्क आपल्या हाताचे बोट कापून घेणे हा त्याचा आनंद म्हणावा की वेडेपणा असा प्रश्न अनेकांना पडला असेल, मात्र याआधीही त्याचे आपल्या हाताची बोटे कापली आहेत. 
अनिल शर्मा हा येथील वैना गावचा रहिवाशी असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा मोठा चाहता आहे. प्रत्येकामध्ये आपला आनंद व्यक्त करण्याची वेगवेगळी इच्छा असते. कुणामध्ये नवीन कपडे घालण्याची असते, तसेच मी सुद्धा नितीश कुमार मुख्यमंत्री झाल्याच्या खुशीत माझ्या डाव्या हाताचे बोट मी कापून ते गंगेत विसर्जित केले असे, अनिलने सांगितले. 
सध्या अनिल शर्मा रुग्णालयात असून त्यांने याआधी २००५ आणि २०१० मध्ये  नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री झाले होते, त्यावेळी आपल्या हाताची बोटे कापून घेतली होती. 
 

Web Title: As Nitish Kumar became the chief minister, he cut his finger in joy