नितीन गडकरींच्या मंत्रालयातील भाड्याची गाडी झाली चोरी

By Admin | Updated: February 18, 2017 17:26 IST2017-02-18T13:46:13+5:302017-02-18T17:26:01+5:30

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अतिरिक्त खासगी सचिव मनोज यांच्या घरासमोरील गाडी चोरीला गेली आहे.

Nitin Gadkari's ministry carriage was stolen | नितीन गडकरींच्या मंत्रालयातील भाड्याची गाडी झाली चोरी

नितीन गडकरींच्या मंत्रालयातील भाड्याची गाडी झाली चोरी

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अतिरिक्त खासगी सचिव मनोज यांच्या घरासमोरील गाडी चोरीला गेली आहे. व्हीआयपी परिसरात कॉलनीचे दरवाजे बंद असतानादेखील चोर इनोव्हा कार घेऊन पळ काढण्यात यशस्वी झाले. पंडारा रोडवरील मनोज यांच्या निवासस्थानासमोर ही चोरी झाली आहे. मात्र हे वाहन मनोज यांच्यामालकीचे नसून ते रस्ते वाहतूक मंत्रालयाने भाडे तत्वावर घेतले होते. त्यामुळे गाडीच्या मालकाने दाखल केलेल्या तक्रारीनंतर टिळक मार्ग पोलिसांनी एफआयआर नोंद केला असून तपास करत आहेत. केंद्रीय मंत्र्यांशी संबंधित हे प्रकरण असल्याने पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आहे. 
 
कार ज्या ठिकाणी पार्क होते, तिथे रात्रीच्या वेळी कॉलनीचे सर्व दरवाजे बंद असतात. तरीही व्हीआयपी परिसरातून अशाप्रकारे बेमालुपणे झालेली चोरी पाहून पोलीस आश्चर्य व्यक्त करत आहेत. पोलीस सध्या सुरक्षारक्षकांकडे चौकशी करत आहेत. रात्री अडीच वाजताच्या दरम्यान चोरी झाल्याचा अंदाज आहे. पोलिसांना सकाळी माहिती मिळाल्यानंतर तपासाला सुरुवात झाली आहे. 
 

Web Title: Nitin Gadkari's ministry carriage was stolen