शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नितिन गडकरी AIMC लागू करणार; मेहनत-वेळ वाचणार, गुणवत्ता सुधारणार; काय आहे हे तंत्रज्ञान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 11:57 IST

ही सिस्टिम बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर सर्वेक्षणांसह प्रकल्प स्थितीचा वास्तविक-वेळ आणि डेटा प्रदान करेल. हा डेटा मंत्रालयासह सर्व संबंधित विभागांना पाठवला जाईल.

राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या बांधकामासाठी होत असलेला विलंब लक्षात घेता, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) ऑटोमेटेड आणि इंटेलिजन्ट मशीन-असिस्टेड कंस्ट्रक्शन (AIMC) सिस्टिमचा वापर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सिस्टिम बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर सर्वेक्षणांसह प्रकल्प स्थितीचा वास्तविक-वेळ आणि डेटा प्रदान करेल. हा डेटा मंत्रालयासह सर्व संबंधित विभागांना पाठवला जाईल.

मंत्रालयाने नुकतेच एक परिपत्रक जारी केले आहे, हे पत्रक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL) सारख्या सर्व संबंधित पक्षांना पाठवले आहे. या परिपत्रकात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमध्ये AIMC च्या वापरासंदर्भात सूचना आणि टिप्पण्या मागवण्यात आल्या आहेत. 

एमओआरटीएचच्या एका अधिकाऱ्याने 'द इंडियन एक्सप्रेस'ला दिलेल्या माहितीनुसार, विभागाने ही अखिल भारतीय योजना तयार करण्यासाठी अमेरिका, नॉर्वे आणि युरोपियन युनियन या देशांच्या सिस्टिमचा अभ्यास केला आहे, जेथे AIMC आधीपासूनच लागू आहे.

का आहे AIMC ची आवश्यकता? -महामार्ग बांधणीसाठी विविध प्रकारच्या यंत्रसामग्रीचा वापर होत असल्याने प्रक्रिया जलद झाली आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आल्याने आणखी एका क्रांतीची वेळ आली आहे. इंटेलिजन्ट रोड कंस्ट्रक्शन मशीन्सच्या विकासामुळे रस्त्यांची गुणवत्ता सुधारते आणि ते अधिक काळ टिकतात.  महत्वाचे म्हणजे, यामुळे रियल टाइम डॉक्युमेंटेशन होईल आणि प्रोडक्टिविटीतही सुधारणा होईल. महत्वाचे म्हणजे, या मशीन्समुळे विहित मुदतीत प्रकल्प पूर्ण करण्यास मदत होईल.

AIMC मशीन्ससंदर्भात थोडक्यात? -AIMC मशीन एक प्रकारे नवे तंत्रज्ञान असलेले मशीन आहे. यात ऑटोमेशन, इंटेलिजन्स, मेकॅनिक्स आणि कंट्रोल यांचा समावेश आहे. सर्वसाधारणपणे AIMC चा वापर वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये केला जातो. जसे की, उत्पादन, बांधकाम, आरोग्यसेवा आणि वाहतूक. अर्थात जेथे, मानवी श्रम कमी करून उत्पादन कार्यक्षमता आणि अचूकता वाढवली जाते. अशा मशीन्सना त्याच्या कार्यानुसार डिझाइन आणि प्रोग्राम केलेले आहे.

अवध एक्स्प्रेसवेवर लागू करण्यात आले AIMC -अवध एक्सप्रेस वे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लखनौ-कानपूर द्रुतगती मार्गावर NHAI ने प्रायोगिक तत्त्वावर AIMC कार्यान्वित केले आहे. येथे GPS-सहाय्यित मोटार ग्रेडर, इंटेलिजेंट कॉम्पॅक्टर आणि स्ट्रिंगलेस पेव्हर सारख्या स्वयंचलित आणि एआय मशीन्सचा वापर करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पायलट प्रोजेक्टच्या आधारे राष्ट्रीय महामार्ग बांधणीत एआयएमसीचा देशभरात वापर केला जाईल.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपा