नितीन गडकरी हेलिकॉप्टर अपघातातून बचावले
By Admin | Updated: June 25, 2015 00:09 IST2015-06-25T00:09:50+5:302015-06-25T00:09:50+5:30
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे बुधवारी हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले. गडकरी हे पश्चिम बंगालच्या हल्दिया येथे एका

नितीन गडकरी हेलिकॉप्टर अपघातातून बचावले
हल्दिया : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे बुधवारी हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले. गडकरी हे पश्चिम बंगालच्या हल्दिया येथे एका कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरने आले होते. त्यांच्या हेलिकॉप्टरसाठी तात्पुरते हेलिपॅड तयार करण्यात आले होते आणि त्यांच्या स्वागतासाठी रेड कार्पेट अंथरण्यात आले होते. हेलिकॉप्टर उतरण्याच्या तयारीत असताना त्याच्या पंख्याच्या जोरदार वाऱ्यामुळे रेड कार्पेट हवेत उडायला लागले. रेड कार्पेटचा एक भाग हेलिकॉप्टरच्या रोटर ब्लेडमध्ये (पंखा) अडकला. वैमानिकाने प्रसंगावधान दाखवून हेलिकॉप्टर पुन्हा वर उडविले आणि अपघात टळला.
‘हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरत असताना पंख्याच्या जोरदार वाऱ्यामुळे रेड कार्पेट हवेत उडून माझ्या हेलिकॉप्टरच्या पंख्याला अडकले; परंतु कोणताही अपघात मात्र घडला नाही. मी सुरक्षित आहे,’ असे गडकरी यांनी पत्रकारांना सांगितले. कार्पेट अथवा झेंडे हेलिकॉप्टर उतरण्याच्या ठिकाणी ठेवायला नको होते. याबाबत त्यांनी सावध असायला पाहिजे, असेही गडकरी म्हणाले. (वृत्तसंस्था)