शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

Bhayyuji Maharaj Suicide: भय्यूजी महाराजांचा अकाली मृत्यू मनाला चटका लावणारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 17:48 IST

आध्यात्मिक धर्मगुरू भय्यूजी महाराज यांनी आत्महत्या केल्यानंतर राजकीय क्षेत्रातून अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे.

नवी दिल्ली- आध्यात्मिक धर्मगुरू भय्यूजी महाराज यांनी आत्महत्या केल्यानंतर राजकीय क्षेत्रातून अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे. भय्यूजी महाराजांची सुसाईड नोटही सापडली असून, त्यांनी कौटुंबिक तणावाला कंटाळून आत्महत्या केल्याचा उल्लेख केला आहे. या घटनेवर नितीन गडकरींनी दुःख व्यक्त केलं आहे. भय्यूजी महाराज यांच्या आकस्मिक निधनाने सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात  मोलाचे योगदान देणारे एक सेवाभावी व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण  केली आहे. भय्युजी महाराजांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक व अविश्वसनीय आहे. अध्यात्म क्षेत्रात महाराष्ट्राचा वारसा पुढे चालविण्याचे काम त्यांनी जोपासले होते. कायम हसतमुख, उत्साही आणि ऊर्जा प्रदान करणाऱ्या भय्युजी महाराजांचे अकाली निधन चटका लावणारे आहे.

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात,  भय्यूजी महाराज यांच्या आध्यात्मिक विचारधारेचे अधिष्ठान लोकसेवा हेच होते. त्यांनी सूर्योदय परिवाराच्या माध्यमातून समाजहितासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांचा वंचित आणि उपेक्षित समाजघटकांना मोठा लाभ झाला आहे. विशेषतः जलसंधारण, भूमी सुधारणा, शिक्षण क्षेत्रासह सामुहिक विवाह चळवळीतही त्यांनी लक्षणीय काम केले होते. विशेषतः महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशमध्ये त्यांनी केलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे हजारो हेक्टर जमिनीला पाणी मिळाले आहे. त्यांच्या निधनाने समाजाला विधायकतेसाठी उद्युक्त करणारा प्रेरणास्रोत हरपला आहे.

आध्यात्मिक गुरु श्री भय्यूजी महाराज यांच्या निधनाची दु:खद बातमी कळली. त्यांच्याशी माझे व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांचा हा अकाली मृत्यू मनाला चटका लावणारा आहे. माझी विनम्र श्रद्धांजली, असं ट्विट करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी ट्विट करत भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येवर दु:ख व्यक्त केले आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली.तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही सहवेदना व्यक्त केल्या. संस्कृती, ज्ञान आणि निस्वार्थी सेवेचा संगम असणारा एका मोठा व्यक्ती देशाने गमावला आहे’, अशी प्रतिक्रिया शिवराज सिंह चौहान यांनी एएनआयकडे दिली आहे.

टॅग्स :Bhayyuji Maharajभय्यूजी महाराजNitin Gadkariनितीन गडकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSuicideआत्महत्याDeathमृत्यूPoliticsराजकारण