शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

"जलमार्ग केला नसता तर प्रियंका गांधींची गंगायात्रा पूर्ण झाली असती का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 14:58 IST

प्रियंका गांधी यांची गंगायात्रा आम्ही जलमार्ग तयार केले नसते तर झाली असती का ? असा सवाल नागपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी प्रियंका गांधी यांना केलाय.

नागपूर - काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी काही दिवसांपूर्वी गंगायात्रा करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेचं लक्ष्य केलं होतं. मात्र प्रियंका गांधी यांची गंगायात्रा आम्ही जलमार्ग तयार केले नसते तर झाली असती का ? असा सवाल नागपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी प्रियंका गांधी यांना केलाय. 

यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, गंगायात्रेच्या दरम्यान प्रियंका गांधी यांनी गंगेचं पाणी प्यायल्या, जर गंगा नदीची स्वच्छता आम्ही केली नसती तर गंगेचे पाणी पिता आलं असतं का ? युपीए सरकारच्या काळात तुम्ही हे काम केलं नाही. ते काम आम्ही केले. मार्च 2020 पर्यंत गंगा नदी पूर्णपणे स्वच्छ झालेली असेल असा दावा नितीन गडकरी यांनी केला. 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी 140 किमीच्या गंगा यात्रा पूर्ण केली होती. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशातील अनेक मतदारसंघात भेट दिली.कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या दौऱ्यावरुनच प्रियांका गांधी यांच्यावर गडकरींनी टीका केली. गंगेत पुन्हा डॉल्फिन मासे दिसायला लागले आहेत. तर प्रयागराजच्या काठावर सायबेरियन पक्षीही पहायला मिळाले. याशिवाय कासवांची संख्याही वाढली असल्याचा विश्वास नितिन गडकरी यांनी व्यक्त केला.

नितीन गडकरी यांनी विरोधकांवरही साधला निशाणायंदाच्या निवडणुकीत विरोधी पक्ष स्वार्थासाठी एकत्र आलेले आहेत. या विरोधी पक्षांचे नेत्यांचे मुख्य उद्दीष्ट आहे की, नरेंद्र मोदी पंतप्रधान बनू नये. विरोधी पक्षांवर आलेल्या संकटामुळे ते सगळे एकत्र आलेत. विरोधी पक्षांकडे कोणताच मुद्दा नाही. यांच्याकडे नेते नाहीत. भाजपा सरकारने आपली सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत तसेच जगात देशाचा सन्मान वाढवला आहे. 

 

प्रियंका गांधी नौका यात्रेनंतर करणार आता रेल्वेने प्रवास प्रियंका गांधी नौका यात्रेनंतर आता रेल्वेनं लोकांशी संपर्क साधणार आहेत. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी असलेल्या प्रियंका गांधी 27 मार्चला दिल्ली ते फैजाबाद दरम्यान रेल्वे यात्रा करणार आहेत. ही यात्रा करताना त्या त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व लोकसभा मतदारसंघातील मतदारांशी संवाद साधतील

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNitin Gadkariनितीन गडकरीPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी